कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतूळमध्ये दोन हजार वर्षांपूर्वीच्या वसाहतीचे गूढ उलगडत आहे. कोतुळमधील भाऊसाहेब देशमुखांच्या शेतात उत्खननाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. डॉ. पांडुरंग साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली 50 विद्यार्थ्यांची टिम हे उत्खनन करत आहे. एक किलोमीटर लांब आणी अर्धा किलोमीटर रुंद अशी सातवाहन काळातील बाजारपेठ असल्याचे पुरावे सापडले आहेत. त्याचबरोबर प्राण्यांचे अवशेष, चुली, मातीची भांडी, सिलिकेट मणी, शंखाच्या बांगड्या मातीची आठशे वर्षांपूर्वीची ऐतिहासिक काळातील सुरई भांडे ही सापडलं.
अकोले तालुक्यातील कोतूळ गावात संशोधकांना पुरातन ठेवा सापडला आहे. दोन हजार वर्षापूर्वीची बाजारपेठ आणी अनेक वस्तू सापडल्या आहेत. कोटुळ येथील सेवानिवृत्त कृषी अधिकारी भाऊसाहेब देशभुख यांच्या शेतात हे उत्खननाचे काम सुरू आहे.. डॉ. पांडुरंग साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली 50 विद्यार्थ्यांची टिम उत्खनन करत असून गेल्या वर्षी काही अवशेष सापडल्याने त्यांनी पुन्हा उत्खननाचे काम सुरू केले असून पहिल्या आणी दुसर्या शतकातील वस्तू आणी बाजारपेठ त्यांना सापडली आहे.
गेल्या सात दिवसांपासून झालेल्या संशोधनात प्राण्यांचे अवशेष, चुली, मातीची भांडी, सिलिकेट मणी, शंखाच्या बांगड्या मातीची आठशे वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक काळातील सुरई भांडे अशा वस्तू सापडल्या आहेत. कोतूळ येथील एक किलोमीटर लांब आणी अर्धा किलोमीटर रुंद अशी सातवाहन काळातील बाजारपेठ असल्याचे पुरावे सापडले आहेत.
जुन्नर ते नाशिक व्यापारी मार्गाच्या खुणा, लागाचा घाट, पीरमाथा येथील पाण्याचे टाके, विश्रांतीगृह यातून सापडतात हा इतिहास कदाचित जोर्वे संस्कृतीच्या पुढे जाण्याची शक्यता असून कोतूळचे ग्रामस्थही या संशोधनाबद्दल आनंदी आहेत. या संशोधनातून ऐतिहासिक ठेवा , पुरातन काळातील लोकांची संस्कृती आणी इतीहास उलगडला जाणार आहे. दिवसागणिक संशोधकांना अनेक पुरातन वस्तू सापडत असून काही दिवसात हे संशोधन कुठल्या काळातील इतिहास उलगडणार हे स्पष्ट होणार आहे.
उत्खननात दोन हजार वर्षांपूर्वी बांगड्या, शंखाच्या बांगड्या, मातीच्या भांड्यांचे अवशेष, ऐतिहासिक काळातील सुरईच्या आकाराची मातीची भांडी तसेच चलनी नाणे, मातीची भांडी, खेळण्याची चाके, रांजण अशा वस्तू सापडल्या आहेत. याशिवाय दुसऱ्या शतकातील पाण्याची विहीर, धान्याचे कोठार, सिलिकेट मणी आदी वस्तु सापडल्या आहेत.