9 वर्षीय भारतीय मुलीने काढलेला फोटो Wildlife Photographer स्पर्धेत दुसऱ्या स्थानी! तिच्या कॅमेरातील हे फोटो एकदा पाहाच

9 Year Old Indian Girl won Wildlife Photographer of the Year 2024 : भारतीय चिमुरडीने जागतिक पातळीवर इतिहास रचला आहे. 5 व्या वर्गात शिकणारी 9 वर्षीय या श्रेयोवी मेहताने काढलेल्या फोटोने Wildlife Photographer स्पर्धेत दुसरं स्थान पटकवलंय. 

Sep 01, 2024, 13:24 PM IST
1/8

दिल्लीजवळील फरीदाबादमध्ये राहणाऱ्या एका 9 वर्षाच्या मुलीने एक आश्चर्यकारक कामगिरी करुन सर्वांना आश्चर्यचकित केलंय.  श्रेयोवी मेहता असं या चिमुकलीचं तिने काढलेल्या फोटोला पारितोषक मिळालय. श्रेयोवी ही वडिलांसोबत नॅशनल पार्कला फिरायला गेली होती. इथे तिने  असा फोटो काढला, जो पाहून सगळेच थक्क झाले. या फोटोसाठी श्रेयोवी 'वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर' साठी रनरअप ठरलीय.

2/8

राष्ट्रीय इतिहास संग्रहालय (NHM) दरवर्षी लंडनमध्ये ही स्पर्धा आयोजित करतात. जगभरातील अनेक मोठे छायाचित्रकार यात सहभागी होतात. पण इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या  श्रेयोवीने सर्वांना मागे टाकत भारतीयांची मान उंचावलीय.  श्रेयोवी तिच्या 'इन द स्पॉटलाइट' फोटोसाठी 'वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर'ची उपविजेती ठरलीय.

3/8

एके दिवशी सकाळी श्रेयोवी तिच्या आई-वडिलांसोबत राजस्थानमधील भरतपूर इथे केवलदेव नॅशनल पार्कला भेट देण्यासाठी गेली होती. उद्यानात मॉर्निंग वॉक करताना तिला दोन मोरांची जोडी दिसली.  श्रेयोवी तिच्या वडिलांकडे धावत गेली आणि त्यांच्या हातातील कॅमेरा हिसकावून घेतला. त्यानंतर हे दृष्य कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी ती जमिनीवर झोपली आणि कॅमेरा जमिनीजवळ ठेवून दोन्ही मोरांचे सुंदर फोटो तिने क्लिक केलं. 

4/8

वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयरच्या 60 व्या आवृत्तीत श्रेयोवी ही उपविजेता ठरलीय. म्हणजेच 10 वर्षांखालील गटात तिने दुसरा नंबर पटकावलाय.  या स्पर्धेत 117 देशांतील हजारो फोटोग्राफर्सनी भाग घेतला होता. अंदाजे 60 हजार छायाचित्रांपैकी श्रेयोवी हिने काढलेला फोटोला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट फोटो म्हणून निवड झालीय. 

5/8

श्रेयोवीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो पोस्ट केलाय. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. तिने लिहिलंय की, 'माझं मन आनंदाने भरलंय.'  श्रेयोवीला फोटोग्राफीच वेड लहानपणापासून आहे. तिला हा बालकडू तिच्या वडिलांकडून मिळाला आहे. तेही फोटोग्राफर आहेत. आता तिचं पुढचं लक्ष्य देशाचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. पुढच्या वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर होण्यासाठी तिने वाघाचे अप्रतिम फोटो काढण्याच लक्ष्य ठरवलंय. 

6/8

8 ऑक्टोबर 2024 रोजी, श्रीवी मेहता यांना लंडनमधील वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयरचा उपविजेता पुरस्कार दिला जाईल. वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर हे प्रदर्शन 11 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून ते 29 जून 2025 पर्यंत चालणार आहे. या कालावधीत सर्व 60 हजार छायाचित्रांचे प्रदर्शन होणार आहे.

7/8

मेहता यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की , "मी सराव करत राहीन जेणेकरून एक दिवस आपला राष्ट्रीय प्राणी - वाघालाही अशीच ओळख मिळेल."

8/8

आपल्या मुलींना त्यांची स्वप्ने पाहण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या पालकांनाही तिने आवर्जून सांगितले. भारताचा राष्ट्रीय प्राणी, वाघ, साठी वन्यजीव छायाचित्रणातील मेहता यांचे मोठे उद्दिष्ट वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर स्पर्धेसारख्या मोठ्या व्यासपीठावर ओळखले जाणे .