गुलाबी थंडीत फिरायला जाण्यासाठी हिमाचल प्रदेशतील 'ही' आहेत Best Places

भारतातील सर्वात आवडते पर्यटन स्थळ मानले जाते. हिमाचल उंच बर्फाच्या पर्वतांनी झाकलेले आहे. 

Dec 08, 2022, 14:50 PM IST

हिमाचल प्रदेश हे भारतातील एक असे पर्यटन स्थळ आहे. जे भारतातील सर्वात आवडते पर्यटन स्थळ मानले जाते. हिमाचल उंच बर्फाच्या पर्वतांनी झाकलेले आहे. हिमाचल प्रदेश हे हिवाळी सुट्टीसाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे, तेथील बर्फाच्छादित पर्वत प्रत्येकाचे मन मोहून घेतात. कुटुंब, हनिमून आणि एकटे प्रवासी हे सर्व दरवर्षी हिवाळी सुट्टीसाठी येथे येतात. थंड हवा, बर्फाच्छादित पर्वत, झाडे, कुरण आणि अप्रतिम हिमाचली खाद्यपदार्थ येथे भेट देणाऱ्या प्रत्येकाच्या लक्षात राहतात.

  

1/5

मनाली - मनाली हे हिमाचल प्रदेशातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. मनाली हे हिमाचल प्रदेशाच्या कुलू जिल्ह्यातील निसर्गसुंदर शहर. बर्फाच्छादित पर्वतशिखरे, उत्तुंग देवदार वृक्ष, जवळून वाहणारा व्यास नदीचा प्रवाह, थंड व आल्हाददायक हवामानामुळे मनाली हे पर्यटकांचे एक आकर्षण ठरलं आहे. देवदाराच्या जंगलांनी आच्छादलेले पर्वत या ठिकाणचे सौंदर्य आणखीनच आकर्षक बनवतात. हिमाचलमध्ये येणारे पर्यटक मनालीच्या सौंदर्यात हरवून जातात. मनालीला भेट देणार्‍या बहुतेक पर्यटकांना रिव्हर राफ्टिंग, ट्रेकिंग, पर्वतारोहण इत्यादी अनेक साहसी गोष्टी करायला आवडतात.

2/5

शिमला - शिमला हे भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हिल्सची राणी शिमला हिमाचल प्रदेशची राजधानी आहे. शिमलाचा ​​मॉल रोड आणि टॉय ट्रेन येथे येणाऱ्या सर्व पर्यटकांना सर्वाधिक आवडते. शिमल्यात तुम्हाला ऐतिहासिक मंदिराच्या इमारती पाहायला मिळतील.

3/5

स्पिती व्हॅली- हिमाचल प्रदेशातील स्पिती व्हॅली चारही बाजूंनी हिमालयाने वेढलेली आहे. बर्फाच्या चादरीत लपेटलेले पर्वत, वळणदार रस्ते आणि येथील सुंदर दऱ्या पर्यटकांना खूप आकर्षित करतात. हिमाचल प्रदेशातील हे एक ठिकाण आहे, जे अत्यंत थंड मानले जाते.

4/5

मॅक्लॉडगंज- मॅक्लॉडगंज हे प्रसिद्ध तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा यांचे घर म्हणून लोकप्रिय आहे. हे हिल स्टेशन जगभरात प्रसिद्ध तिबेटी अध्यात्मिक नेते दलाई लामा यांच्या निवासस्थानासाठी प्रसिद्ध आहे. चहुबाजूंनी टेकड्यांमध्ये वसलेले, मॅक्लॉडगंज प्राचीन तिबेटी आणि ब्रिटिश संस्कृतीने वेढलेले आहे.

5/5

डलहौसी- डलहौसी हे हिमाचल प्रदेशातील एक छोटेसे शहर आहे, जे येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी नंदनवन मानले जाते. डलहौसी त्याच्या सभोवतालची नैसर्गिक दृश्ये, फुले, कुरण, वेगाने वाहणाऱ्या नद्या, भव्य धुक्याचे पर्वत यांनी वेढलेले आहे. डलहौसी हे हनिमूनसाठी हिमाचलमधील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक मानले जाते.