रणदीप हुड्डाचं मिस युनिव्हर्स सोबत झालं होत ब्रेकअप, आता म्हणाला...

सुष्मिताशी ब्रेकअप झाल्यानंतर रणदीप हुड्डा म्हणाला... 'माझ्यासोबत घडलेली ही सर्वात चांगली गोष्ट आहे'

Jul 09, 2022, 14:53 PM IST

मुंबई : बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सुष्मिता सेन आणि अभिनेता रणदीप हुडा हे प्रचंड मोठी फॅन फॉलोईंग असलेले अभिनेते आहेत. या कलाकारांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर म्हणावा तेवढा धिंगाणा घातला नसेल पण त्यांच्या अभिनयामुळे त्यांना खुप मोठा चाहता वर्ग मिळवला आहे. 

1/5

बी-टाउनमधील हे दोन कलाकार हॉट सिंगल्स असण्या व्यतिरिक्त, हे दोघे एकेकाळी बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स म्हणून देखील चर्चेत राहिले आहेत.

2/5

एका मीडिया रिपोर्टनुसार, काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांच नातं तुटलं. पण हे कपलची लव्ह स्टोरी बॉलिवूड विश्वात खुप चर्चेत राहिली होती. 

3/5

रणदीपने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत त्याच्या ब्रेकअपबद्दल बोलताना त्याच्या रिलेशनशीप बद्दल सांगितलं. त्यांच्या नात्याचा शेवट कसा झाला ते सांगताना तो म्हणाला की "मी 'मिस युनिव्हर्स' सोबत रिलेशनशिपमध्ये नव्हतो आणि तिच्यासोबतच्या माझ्या रिलेशनशिपमध्ये मला विजयाची कोणतीही भावना जाणवली नाही."

4/5

पुढे सांगताना तो म्हणाला, "थिएटर रिहर्सलला माझ्या आयुष्यात खुप महत्त्वाचं स्थान आहे. सुष्मिताची इच्छा होती की मी रिहर्सलला जाऊ नये आणि ते माझ्या तत्त्वांच्या विरोधात होतं. मला प्रसिद्धी मिळाली होती, पण तरीही मी काठावर होतो, कारण मी एक स्टार सुद्धा नव्हतो'. ब्रेकअप होताना मला असं जाणवलं की ही जी काही घटना माझ्यासोबत घडतीये ती सर्वात चांगली गोष्ट आहे आणि मला जाणवलं की मी माझ्या आयुष्यातला खूप वेळ घालवला आहे."  

5/5

तो पुढे असं देखील म्हणाला की दोघांमध्ये कोणतीही कमिटमेंटची कोणतीही समस्या नव्हती कारण ते परस्पर संमतीने वेगळे झाले आणि त्यांना एकमेकांबद्दल कठोर भावना नाहीयेत. सुष्मिता सेन मॉडेल रोमन शॉलसोबत दीर्घकाळ रिलेशनशीपमध्ये होती आणि काही काळापूर्वी या कपलचं देखील ब्रेकअप झालं, पण नंतर ते खूप जवळचे मित्र राहिले.