लहानपणीच मुंबईची वाट पकडली, सीए करताना लागला अ‍ॅक्टिंगचा नाद अन्...; बॉलिवूडच्या कलाकाराला ओळखलं का?

Bollywood Actor Childhood Photo: तुम्ही या फोटोमधील कलाकाराला ओळखलं का?

Jul 14, 2023, 19:44 PM IST

Siddhant chaturvedi Childhood Photo: बॉलिवूडमधील कलाकारांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरू असते. कधी त्यांच्या मालिका, सिनेमा तर कधी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल चाहते बोलत असतात. तर कधी कलाकारांचे लहाणपणीचे फोटो चर्चेचा विषय असतो.

 

1/5

गली बॉय

झोया अख्तरचा 'गली बॉय' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुराळा केला होता. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट सारख्या कलाकारांनी या चित्रपटातून नवी ओळख निर्माण केली. या सिनेमात सर्वांचं आकर्षण राहिला तो सिद्धांत चतुर्वेदी.

2/5

एमसी शेर

गली बॉय या चित्रपटात एमसी शेरच्या भूमिकेत दिसला होता. त्यानंतर देशभरात त्यांची खास ओळख झाली. या चित्रपटानंतर सिध्दांत चतुर्वेदी चित्रपटाच्या पडद्यावर झळकतोय.

3/5

सीए व्हायचं होतं..

उत्तर प्रदेशातील बलिया येथून वयाच्या पाचव्या वर्षी सिध्दांत मुंबईत आला. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याला सीए व्हायचं होतं. शाळा कॉलेज संपल्यानंतर त्याने सीए परीक्षेची तयारी केली आणि परीक्षाही पास केली. त्याचवेळी त्याला अभिनयाचा नाद लागला.

4/5

करियरमधून ब्रेक

करियरमध्ये मोठा ब्रेक घेतल्यानंतर 2016 मध्ये लाइफ सही है या वेबसीरिजमध्ये काम केलं. सिध्दांतला झोया अख्तरच्या गली बॉयमध्ये भूमिका मिळाली.

5/5

लहाणपणीच्या आठवणी

काही दिवसांपूर्वी सिद्धांतने मदर्स डे दिवशी त्याच्या आईसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमधून त्याने लहाणपणीच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.