Budh Dosh : कुंडलीतील बुध ग्रह कमजोर असेल तर होते धनहानी, जाणून घ्या संकेत आणि उपाय

Budh Dosh Upay : कुंडलीतील बुध ग्रह अशुभ स्थितीत असेल तर मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो. त्यामुळे बुध दोषाचे संकेत आणि उपायाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Aug 23, 2023, 11:20 AM IST

Budh Dosh Upay in marathi : बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, संवाद आणि निर्णय क्षमतेचा कारक आहे. पण कुंडलीतील बुधाची स्थिती अशुभ असेल तर जाचकावर धनहानीसोबत शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. (Budh Remedies)

1/8

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाची शुभ किंवा अशुभ प्रभाव हा राशीच्या दशा, अंतरदशा किंवा प्रत्यंतरदशा ठरवतो. कुंडलीतील बुधाची स्थिती अशुभ असल्यास जाचकाला संकेत मिळतात.   

2/8

लाल किताबानुसार संकेत

गुप्त रोग होणे, नखे आणि केस कमकुवत होतात, पचनशक्ती कमजोर होणे, वासाची शक्ती कमी होणे, वेळपूर्वी दात कमकुवत होतात.   

3/8

बोलण्याची क्षमता कमकुवत होते, मित्रांशी संबंध खराब होतात, नोकरी किंवा व्यवसायात मोठं नुकसान होतं. लैंगिक शक्तीदेखील कमकुवत होते. 

4/8

बुध दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी घरामध्ये रुंद पाने असलेली झाडे लावा. घराच्या मुख्य दारावर पंचपल्लवांचे तोरण लावा.   

5/8

बुध दोष दूर करण्यासाठी पन्ना किंवा मार्गज रत्न धारण करा. ते परिधान करण्यापूर्वी त्याची योग्य प्रकारे पूजा नक्की करा. 

6/8

 बुधवारी उपवास ठेवा आणि विघ्नहर्त्याची पूजा करा. सोबतच बीज मंत्राचा जप 'ओम ब्रम् ब्रम् ब्रौं सह बुधाय नमः!' जप करा. 

7/8

बुधवारी पूजा केल्यानंतर हिरव्या रंगाशी संबंधित वस्तू गरीब ब्राह्मणाला दान करा. यामुळे व्यक्तीला बुध दोषापासून मुक्ती मिळते.   

8/8

या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करा. शिवाय बुधवारी गायीला हिरवे गवत खायला द्या.(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)