प्रचंड उकाड्यात AC मध्ये अंगावर चादर घेऊन झोपणं किती धोकादायक? सरकारी एजन्सीने सांगितलं सत्य

एसीचा जास्त वापर केल्याने आपण आजारी पडू शकतो का? आज याचं उत्तर जाणून घेऊयात.   

| Aug 18, 2024, 13:49 PM IST

एसीचा जास्त वापर केल्याने आपण आजारी पडू शकतो का? आज याचं उत्तर जाणून घेऊयात. 

1/9

पावसाळ्यात तापमानात घट होत असल्याने आर्द्रता वाढते. आर्द्रता वाढल्याने फार गरम होतं, यामुळे अनेक लोक एसीचा वापर करतात. पण यामुळे काहींना सर्दी, ताप येतो.   

2/9

पण एसीचा जास्त वापर केल्याने आपण आजारी पडू शकतो का? आज याचं उत्तर जाणून घेऊयात.   

3/9

ऊर्जा मंत्रालयातील तज्ज्ञांच्या मते, एसीला 26 डिग्री सेल्सिअस तापमानावर चालवलं पाहिजे.  तसंच यासह पंख्याचा वापर करा.   

4/9

एसीचा योग्यप्रकारे वापर कऱणंही गरजेचं आहे. काहीजण एसी 20-22 डिग्री सेल्सिअसवर ठेवतात आणि थंडी वाजू लागली की अंगावर चादर घेतात.   

5/9

मानवी शरीर 23 ते 39 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान सहन करु शकतं. याला मानवी शरिराची सहिष्णुता म्हटलं जातं.   

6/9

एसीला जेव्हा 19, 20 किंवा 21 डिग्री सेल्सिअसवर चालवलं जातं, तेव्हा रुमचं तापमान शरीराच्या तापमानापेक्षा कमी असतं. अशात शरिरामध्ये हायपोथर्मिया प्रोसेस सुरु होते.   

7/9

हायपोथर्मिया दरम्यान शरिरातील काही भागांना योग्य प्रकारे रक्ताचा पुरवठा होत नाही. एसीमध्ये जास्त वेळ घालवणाऱ्यांना बराच काळ त्याचे तोटे सहन करावे लागतात. यामुळे संधिवातासारखे त्रास होतात.   

8/9

एसी असणाऱ्या रुम किंवा हॉलमध्ये असणाऱ्यांना घाम येत नाही, ज्यामुळे शरिरातील टॉक्सिन बाहेर येत नाहीत. अशात अनेक आजार बळावू शकतात.   

9/9

एसीमध्ये जास्त वेळ घालवल्यास अनेकांना त्वचा, रक्तदाब, आणि हाडांशी संबंधित समस्या जाणवू शकतात.