प्रवाशांची गर्दी पाहून मध्य रेल्वेनं उचललं पाऊल; 'या' मार्गावर चालवणार विशेष ट्रेन

Central Railway : मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आकडा मोठा आहे. अशा या मध्य रेल्वेच्या विस्तारित मार्गांवरही दर दिवशी गर्दी वाढत आहे.   

Oct 07, 2023, 13:08 PM IST

Central Railway : मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी बऱ्याचदा काही विशेष सुविधांची आखणी केली जाते. 

1/7

प्रवाशांची वाढती गर्दी

Central railway to run pune harangul special train on daily basis latest update

Central Railway : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुणे आणि हरंगुळ या स्थानकांदरम्यान विशेष ट्रेन निर्धारित वेळापत्रकानुसार  चालवण्याचा निर्णय घेतला आहे.   

2/7

पुणे- हरंगुळ

Central railway to run pune harangul special train on daily basis latest update

01487 पुणे- हरंगुळ 10 ते 31 ऑक्टोबरपर्यंत पुण्याहून 6 वाजून 10 मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी 12 वाजून 50 मिनिटांनी हरंगुळला पोहोचेल.  

3/7

हरंगुळ- पुणे

Central railway to run pune harangul special train on daily basis latest update

 01488 हरंगुळ- पुणे 10 ते 31 ऑक्टोबरपर्यंत हरंगुळ येथून दुपारी 3 वाजता सुटेल आणि रात्री 9 वाजता पुण्याला पोहोचेल.   

4/7

थांबे

Central railway to run pune harangul special train on daily basis latest update

या रेल्वेला हडपसर, उरुळी, केडगाव, दौंड, जेऊर, केम, कुर्डूवाडी, बार्सी टाऊन आणि उस्मानाबाद अशा स्थानकांवर थांबे असतील. 

5/7

रेल्वे डबे

Central railway to run pune harangul special train on daily basis latest update

एक फर्स्ट एसी, एक सेकंड एसी, 4 थर्ड एसी, 5 स्लीपर, आणि 3 जनरल सेकंड क्लास डब्यांसह लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार असे डबे असतील. 

6/7

बुकिंग

Central railway to run pune harangul special train on daily basis latest update

या रेल्वेनं प्रवास करण्यासाठी विशेष शुल्कासह विशेष ट्रेन क्रमांक 01487/01488 च्या विस्तारित फेऱ्यांसाठीचं बुकिंग दि. 8 ऑक्टोबर रोजी सर्व आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू असेल.

7/7

NTES ॲप डाउनलोड करावं

Central railway to run pune harangul special train on daily basis latest update

 या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या सविस्तर वेळा आणि माहिती www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाउनलोड करावं असं आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात येत आहे.