ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, भारताच्या चिनाब ब्रीजवर चीनचा नजर; पाकिस्तानच्या मदतीने रचला जायोत मोठा कट?

Chenab Railway Bridge :काश्मीरच्या अत्यंत दुर्गम भागात अशक्य बांधकामं करण्यात आले आहे. येथे अतिविशाल असा चिनाब रेल्वे पुल उभारण्यात आला. चीन या ब्रीजची हेरगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. 

| Nov 01, 2024, 22:20 PM IST

Pakistani and Chinese intelligence agencies on Chenab Railway Bridge  :  कुणी म्हणतं हे आश्चर्य आहे... कुणी म्हणतं हे अद्भूत आहे... कुणी म्हणतं अविश्वनीय आहे... कुणासाठी हे स्वप्नवत आहे.. तर कुणासाठी शेकडो किलोमीटरचा वळसा वाचवणारं आहे आणि अमाप संधी उघडणारा राजमार्ग आहे... यातून सगळ्या जगाला भारतीय इंजिनियर्सची अजोड बुद्धिमत्ता दिसलीये. भुगोल आणि विज्ञानाची सगळी सर्व आव्हानं झेलत हा अतिविशाल पूल उभारला जातोय... पॅरीसचा आयफेल टॉवरही त्याच्यापुढे खुजा ठरेल. काश्मीरच्या अत्यंत दुर्गम चिनाब रेल्वे ब्रीज बांधण्यात आला आहे.   भारताच्या चिनाब ब्रीजवर चीनची नजर आहे. पाकिस्तानच्या मदतीने मोठा कट रचला जात आहे. 

1/7

आयफेल टॉवरपेक्षा उंच आणि इंद्रधनुष्यासारखी कमान असलेला हा पूल जगातलं एक आश्वर्य ठरणार आहे. नुकतीच या  ब्रिजवरुन रेल्वे इंजिनची चाचणी घेण्यात आली. हा ब्रीज प्रवाशांसासाठी खुला होण्याआधीच चीनने याच्यावर नजर ठेवयाला सुरुवात केली आहे.  चिनाब ब्रिजबाबत गुप्तचर विभागाकडून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

2/7

पाकिस्तान चीनसोबत मिळून जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची माहिती गोळा करत आहे. प्रामुख्याने चिनाब ब्रीजबाबतची माहिती मिळवण्याचा प्रयत्न चीन करत आहे. यासाठी पाकिस्तानची मदत घेतली जात आहे. 

3/7

ब्रिज बनवण्यासाठी एक खास प्रकारची केबल वापरण्यात आली आहे. ज्याची क्षमता 20 आणि 37 मेट्रीक टन आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 266 किलोमीटर प्रति तासाने जरी वारे वाहत असतील तरी हा पूल हलणार नाही.  

4/7

स्वातंत्र्यानंतर भारतीय रेल्वे (Indian Railway History) च्या इतिहासास हा पूल विज्ञान आणि तंत्रज्ञानांचं उत्तम उदाहरण म्हणून पुढे येणार आहे. प्रोजेक्टमध्ये एकूण 38 टनल आहेत. सर्वात लांब टनल ही 12.75 किलोमीटरची आहेत.  

5/7

हा पुल कुतुबमीनारच्याही 5 पट अधिक उंच आणि पॅरिसच्या आयफेल टॉवर पेक्षाही 35 मीटर उंच आहे. 4  ब्रिज चिनाब नदीवर तब्बल 359 मीटर उंचीवर उभारण्यात आलाय. तर या ब्रिजची मुख्य कमान 467 मीटर इतकी आहे.    

6/7

बनिहालदरम्यान रियासी इथं चिनाब नदीवर हा पूल उभारण्यात आला आहे. या पुलाची उंची नदीपासून 359 मीटर आहे.  

7/7

काश्मीर खोऱ्याला देशाशी रेल्वेनं जोडणारा हा मार्ग आहे. स्थानिकांसाठी अनेक संधी यामुळे खुल्या होणार आहेत.