Asia Cup 2023 आधी क्रिकेटचाहत्यांसाठी मोठी बातमी, 'या' ठिकाणी पाहू शकता सर्व सामने मोफत

Asia Cup 2023 :  एशिया कप 2023 स्पर्धेसाटी भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) टीम इंडियाची (Team India) घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात सतरा खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आता क्रिकेटचाहत्यांना उत्सुकता आहे ती प्रत्यक्ष स्पर्धेची. पण हे सामने कुठे पाहाता येणार हे जाणून घ्या.

| Aug 22, 2023, 16:58 PM IST

Asia Cup 2023 :  एशिया कप 2023 स्पर्धेसाटी भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) टीम इंडियाची (Team India) घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात सतरा खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आता क्रिकेटचाहत्यांना उत्सुकता आहे ती प्रत्यक्ष स्पर्धेची. पण हे सामने कुठे पाहाता येणार हे जाणून घ्या.

1/7

क्रीडा प्रेमींसाठी हे वर्ष क्रिकेटची मेजवानी घेऊन आलंय. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला एशिया कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यानंतर एक महिन्यातच म्हणजे ऑक्टोबरला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. 

2/7

पाकिस्तान आणि श्रीलंकेत येत्या 30 ऑगस्टपासून 17 सप्टेंबरपर्यंत एशिया कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. स्पर्धेत एकूण 13 सामने खेळले जाणार असून यातले चार पाकिस्तानात तर 9 सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. 

3/7

एशिया कप स्पर्धेत टीम इंडिया आणि कट्टर प्रतिस्पर्धा पाकिस्तानचा संघ एकाच ग्रुपमध्ये आहे. तर पहिल्यांदाच एशिया कपमध्ये खेळणारा नेपाळ संघही याच ग्रुपमध्ये आहे. 

4/7

करोडो क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा असलेला भारत-पाकिस्तानदरम्यानचा सामना 2 सप्टेंबरला खेळवला जाणार असून श्रीलंकेतल्या कँडी इथे हो दोनही संघ आमनेसामने येतील

5/7

भारत-पाकिस्तान सामन्याची पर्वणी मिळणार असतनाच क्रीडाप्रेमींसाठी आणखी एक खुशखबर समोर आली आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारने क्रिकेट चाहत्यांना एक गिफ्ट दिलं आहे. 

6/7

एशिया कप 2023 स्पर्धेतले सर्व सामने क्रिकेटचाहत्यांना डिज्नी प्लस हॉटस्टारवर मोफात येणार आहेत. म्हणजेच मोबाईलवर एशिया कपचे सामने पाहण्यासाठी क्रिकेटचाहत्यांना आता पैसे द्यावे लागणार नाहीत. 

7/7

30 ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध नेपाळ सामन्याने एशिया कप स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर 31 ऑगस्टरोजी कँडीत बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका,  2 सप्टेंबरला कँडीत भारत विरुद्ध पाकिस्तान, 3 सप्टेंबरला बांग्लादेश वि. अफगाणिस्तान, 4 सप्टेंबरला भारत वि. नेपाळ आणि 5 सप्टेंबरला श्रीलंका वि. अफगाणस्तान सामने रंगणार आहेत.