परदेशातील नोकरी सोडून भारतात सोशल वर्क करतेय सुरेश रैनाची पत्नी प्रियंका रैना

Jul 16, 2020, 12:57 PM IST
1/5

यूरोपमध्ये करत होती नोकरी

यूरोपमध्ये करत होती नोकरी

प्रियंका चौधरी हिने गाझियाबादच्या कृष्णा इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजीमधून बी.टेक केलं आहे. त्यानंतर तिने आयटी प्रोफेशनल म्हणून करिअर सुरु केलं. नेदरलँडमध्ये बँकिंग सेक्टरमध्ये ती जॉब करत होती.

2/5

२०१५ मध्ये विवाह

२०१५ मध्ये विवाह

सुरेश रैना आणि प्रियंका चौधरी लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. दोघेही शेजारीच राहत होते. ३ एप्रिल २०१५ ला सुरेश आणि प्रियंका विवाहबंधनात अडकले. २०१६ मध्ये प्रियंकाने मुलीला जन्म दिला. तिचं नाव ग्रेसिया आहे. मुलीच्याच नावाने या संस्थेचं नाव ग्रेसिया रैना फाउंडेशन सुरु करण्यात आलं.

3/5

फाउंडेशनचा उद्देश

फाउंडेशनचा उद्देश

या एनजीओचा उद्देश गरीब मुलांना मदत करण्याचा आहे. याशिवाय महिला सशक्तीकरण, जन्मलेल्या बाळांच्या समस्या, गर्भवती महिलांमध्ये जारुकता, प्रेग्नेंसीदरम्यान योग्य सल्ला ही संस्था करते.

4/5

सेवा आणि समर्पण

सेवा आणि समर्पण

प्रियंका चौधरी म्हणते की, सेवा आणि समर्पणच्या माध्यमातून समाजात बदल होतो. गरीब मुलांना मदत करणं महत्त्वाचं आहे.

5/5

प्रियंकाला सामाजिक कार्याची आवड

प्रियंकाला सामाजिक कार्याची आवड

सुरेश रैना आयपीएल आणि इतर क्रिकेट टूर्नामेंट्समुळे व्यस्त असतो. त्यामुळे फाउंडेशनचं बरंच काम प्रियंका सांभाळते आहे. महिलांना भेटून ती त्यांचाया समस्या समजून घेते आणि त्यांना कशा प्रकारे मदत करता येईल ती करते. परदेशातील नोकरी सोडून ती समाजकार्यात गुंतली आहे.