150 वर्ष जुन्या 'ही' Golden Haveli का आहे चर्चेत? परदेशी पाहुण्यांनी लागले वेड

Golden Haveli Delhi : चांदणी चौकात एकेकाळी हजारो हवेल्या होत्या मात्र शहरीकरणांनंतर आता त्यांची संख्या केवळ 100 इतकी झाली आहे. त्यापैकीच एक हवेली आहे जी 150 वर्षे जुनी आहे. आता या 150 वर्षे जुन्या गोल्डन हवेलीचे उद्घाटन करण्यात आले आहे. ओल्ड दिल्लीच्या लहान आणि अरुंद गल्ल्यांमध्ये वसलेली ही गोल्डन हवेली 19व्या शतकातील जुन्या आठवणींना उजाळा देते. मुघल स्थापत्यकलेचा एक नमुना असलेली ही हवेली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुघल शैलीत बांधलेल्या या हवेलीचे उद्घाटन 9 मार्च रोजी झाले. चला तर पाहूया 150 वर्ष जुन्या या गोल्डन हवेलीचे आतील फोटो.

Mar 12, 2023, 19:31 PM IST
1/5

Golden Haveli Delhi

दिल्लीमध्ये होणाऱ्या G-20 समेटला येणाऱ्या पाहुण्यांच्या मेजवानीसाठी दिल्लीची भव्य गोल्डन हवेली सज्ज झाली आहे. सुमारे 75 देशांतील परदेशी पाहुण्यांचा पाहुणचारासाठी गोल्डन हवेली चांगली तयार करण्यात आली आहे. ही हवेली म्हणजे कलेचा एक उत्तम नमुना आहे. 

2/5

Golden Haveli Delhi

हा वाडा चांदनी चौकातील लाल किल्ला आणि जामा मशीद या दोन्हीच्या  अगदी जवळ आहे. G-20 च्या निमित्ताने सजवलेला वाडा नव्या रुपात अतिशय सुंदर दिसत आहे. या वाड्याला एकूण तीन मजले आहेत. त्याच्या दक्षिण भागात एक तळघर देखील आहे. याशिवाय तळमजल्यावरही काही दुकाने आहेत.

3/5

Golden Haveli Delhi

विशेष म्हणजे चांदणी चौकातील गोल्डन हवेलीचे नूतनीकरण करण्यास 4 वर्षे लागली आहेत. त्याची रचना आणि भिंती मजबूत करण्यात आल्या आहेत. सुशोभीकरणाबरोबरच या हवेलीची पारंपरिक शैलीही जपण्यात आली आहे.

4/5

Golden Haveli Delhi

चांदणी चौकातील ही प्रसिद्ध हवेली किनारी बाजार आणि जोहरी बाजार दरिबाजवळ आहे. गोल्डन हवेलीच्या छतावर उभे राहिल्यास लाल किल्ला आणि जामा मशीद दोन्ही दिसतील.

5/5

Golden Haveli Delhi

नुतनीकरण केल्यानंतर चांदणी चौकातील गोल्डन हवेली G20 च्या परदेशी पाहुण्यांसाठी पूर्णपणे सज्ज आहे. तर या हवेलीचे नुतनीकरण करत असताना त्याचं मुळ रुप जपणं खूप महत्तावचं होतं.