close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'कान' फेस्टिवलमध्ये 'ही' अभिनेत्री दीपिका-प्रियंकापेक्षा पुढे...

सध्या 'कान फिल्म फेस्टिवल'च्या चर्चा सर्वत्र रंगत आहेत. सेलिब्रिटींच्या कपड्यांच्या चर्चातर वाऱ्यासारख्या पसरतच आहेत.

May 19, 2019, 19:57 PM IST

मुंबई : सध्या 'कान फिल्म फेस्टिवल'च्या चर्चा सर्वत्र रंगत आहेत. सेलिब्रिटींच्या कपड्यांच्या चर्चातर वाऱ्यासारख्या पसरतच आहेत. कोणत्या अभिनेत्रीने किती हटके लूकचे कपडे घातले आहेत, कोणावर संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या आहेत, यामध्ये जणू स्पर्धाच रंगली आहे. दीपिका आणि प्रियंका या दोन अभिनेत्रींनी स्वत:च्या शिरोपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पण कानमध्ये एका अभिनेत्रीने या हरहुन्नरी अभिनेत्रींना सुद्धा मागे टाकले आहे. अभिनेत्री डायना पेंटीने तिच्या अदांनी सर्वांना घायाळ केले आहे.

1/5

डायना पेंटी 'कान' फेस्टिवलच्या पहिल्या दिवशी सोनेरी रंगाच्या ड्रेसमध्ये झळकली. डायना या लूकमध्ये डिस्को थीम आणि ८०-९०च्या दशकातील अभिनेत्रींच्या लूकवर प्रकाश टाकत आहे.

2/5

'कान' फेस्टिवलमध्ये भाग घेणाऱ्या अभिनेत्रींची यादी दिवसागणिक वाढताना दिसत आहे. 

3/5

यंदाच्या ७२व्या 'कान' फेस्टिवलमध्ये डायनाने ग्लॅमरस अवतारात डेब्यू केले आहे. दुसऱ्या दिवशी तिने पांढऱ्या रंगाच्या साडीमधील गाऊन घातले होते.

4/5

डायनाने तिसऱ्या दिवशी काळ्या आणि गुलाबी रंगाचा गाऊन घातला होता. डायनाचा हा लूक अत्यंत आकर्षक आणि ग्लॅमरस होता.

5/5

डायनाचे 'कान फेस्टिवल' मधील तीन लूक चांगलेच व्हायरल होत आहेत. डायनाने 'कॉकटेल' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. त्यानंतर ती 'परमाणु' चित्रपटात झळकली होती.