बाप रे! क्रिती सेननचा बॉयफ्रेंड कबीर इतका श्रीमंत, सलमान-अक्षय कुमारपेक्षाही दुप्पट कमाई

Kriti Sanon-Kabir Bahia : अभिनेत्री क्रिती सेनन सध्या बॉलिवूडमधल्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. सध्या अनेक प्रोजेक्टवर ती काम करतेय. या दरम्यान क्रिती एका उद्योगपतीला डेट करत असल्याची कथित चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी क्रिती आणि या उद्योगपतीचे फोटोही व्हायरल झाले होते.

| Aug 01, 2024, 20:10 PM IST
1/9

बाप रे! क्रिती सेननचा बॉयफ्रेंड कबीर इतका श्रीमंत, सलमान-अक्षय कुमारपेक्षाही दुप्पट कमाई

2/9

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननने नुकताच आपला 34 वा वाढदिवस लंडनमध्ये साजरा केला. यावेळी तिच्याबरोबर जवळचे काही मित्र आणि कुटुंब उपस्थित होतं. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यातल्या काही फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. क्रिती सेननबरोबर या फोटोत तिचा कथित बॉयफ्रेंडही दिसत  आहे. 

3/9

क्रिती सेनन लंडनमधला तरुण उद्योगपती कबीर बाहियाला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. यावर क्रितीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. क्रितीच बॉयफ्रेंड कबीर कोण आहे याचीही चाहत्यांना उत्सुकता आहे. 

4/9

क्रितीचा कथित बॉयफ्रेंड कबीर बाहिया हा लंडनमधला प्रसिद्ध उद्योगपती आहे. कबीर हा वर्ल्डवाईड एविएशन एंड टूरिझम लिमिटेडचा फाऊंडर आहे आणि तो प्रचंड श्रीमंत आहे. 

5/9

कबीर श्रीमंत उद्योगपती कुटुंबातला आहे. त्याचे वडिल कुलजिंदर बहिया हे साऊहॉल ट्रॅव्हलचे मालक आहेत. कबीरचे लंडनमध्ये अनेक बड्या उद्योगपतींशी जवळचे संबंध आहेत. किंग चार्ल्सही कबीरच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सामील आहेत.

6/9

कबीर बाहिया टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीची पत्नी साक्षी सिंह धोनीचा फॅमिली फ्रेंड असल्याचीही चर्चा आहे. कबीर बहिया 25 वर्षांचा आहे आणि क्रिती सेननपेक्षा तो 9 वर्षांनी लहान आहे. 

7/9

कबीर बाहियाच्या नेटवर्थ बद्दल सांगायचं झालं तर त्याची एकूण संपत्ती ही 4600 कोटी रुपये इतकी आहे. बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटिंपेक्षा कबीरची कमाई दुप्पट आहे. 

8/9

बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान कमाईच्या बाबतीत कबीर बाहियापेक्षा खूप मागे आहे. रिपोर्टननुसार सलमान खानची एकुण संपत्ती 2900 कोटी रुपये इतकी आहे.

9/9

तर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारही कबीर दाहियापेक्षा कमाईत खूपच मागे आहे. रिपोर्टनुसार अक्षय कुमारची नेटवर्थ 2500 कोटी रुपये इतकी आहे.