close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

रुपेरी पडद्यावर गाजली खराखुरा हिरो असणाऱ्या 'बापा'ची कहाणी

कामाच्या जाळ्यात अडकलेल्या वडिलांचं प्रेम ओठांवर नसलं तरी, मनात कायम कुटुंबाची चिंता असते.

Jun 12, 2019, 12:51 PM IST

मु्ंबई : आजच्या युगात 'डे'ज साजरा करण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक 'डे' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. येत्या १६ तारखेला 'फादर्स डे' आहे. पण कित्येकांना याची कल्पना देखील नसेल. नेहमी आई बद्दल अनेक लेख, कविता वाचायला मिळतात. पण वडिलांबद्दल फार क्वचितच असं होतं. संपूर्ण कुटुंबाचा भार आपल्या खांद्यावर घेणाऱ्या बापाकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जातं. कामाच्या जाळ्यात अडकलेल्या वडिलांचं प्रेम ओठांवर नसलं तरी, मनात कायम कुटुंबाची चिंता असते. त्यामुळे लेख आणि कवितांच्या शीर्षकाची जागा वडिलांना घेता आली नाही.

बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांच्या माध्यमातून वडिलांच्या प्रेमाला प्रकाशझोतामध्ये आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, आणि तो यशस्वी सुद्धा ठरला. रूपेरी पडद्यावरील बाप-लेक, बाप-बेटा यांच्या नात्यातील ती प्रेमाची नाळ अगदी मनाला स्पर्श करून जाते. अशा या प्रेमळ नात्यावर साकारण्यात आलेले काही चित्रपट...

1/5

जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा 'सारांश' चित्रपट

जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा 'सारांश' चित्रपट

१९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सारांश' चित्रपटने वडील आणि मुलगा यांच्या नात्यातील सार प्रेक्षकांच्या समोर आणला. अमेरिकेत मुलाचा मृत्यू होतो आणि मुलाच्या अस्ती मिळवण्यासाठी अनुपम खेर कशा प्रकारे जिवाचा आटापिटा करतात हे 'सारांश' चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आले होते.  

2/5

अभिनेते कमल हसन यांचा 'चाची ४२०'

अभिनेते कमल हसन यांचा 'चाची ४२०'

१९९७ च्या 'चाची ४२०' चित्रपटात कमल हसन यांनी चित्रपटात वडील आणि आयाची भूमिका साकारली होती. मुलगी आणि पत्नीपासून विभक्त झालेल्या हसन यांनी आपल्या मुलीला भेटण्यासाठी आयाची भूमिका साकारली होती. चित्रपट विनोदी त्याचप्रमाणे वडील आणि मुलीच्या नात्याला दुजोरा देणारा ठरला.

3/5

अभिनेता अक्षय कुमारच्या 'रिश्ते' चित्रपटाने नात्यांची खरी किंमत पटवून दिली.

अभिनेता अक्षय कुमारच्या 'रिश्ते' चित्रपटाने नात्यांची खरी किंमत पटवून दिली.

२००२ मध्ये रूपेरी पडद्यावर दाखल झालेल्या 'रिश्ते' चित्रपटाने चाहत्यांच्या मनात घर केले. वडील आणि मुलाच्या नात्यातील निरागस प्रेम, वडिलांचे आपल्या जीवनात असलेले महत्व पटवून देतो. अभिनेत्री करिष्मा कपूर आणि अनिल कपूर यांनी चित्रपटात महत्वाची भूमिका बजावली आहे.   

4/5

जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन यांचा 'पा'

जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन यांचा 'पा'

२००९ मध्ये आलेल्या 'पा' चित्रपटाचे दिग्दर्शन आर. बाल्की यांनी केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसात मिळाला. चित्रपटात अभिषेकने वडिलांची भूमिका साकारली होती. चित्रपटात अमिताभ यांच्या वडिलांची भूमिका त्यांच्याच मुलाने साकारली होती. 

5/5

अभिनेता अजय देवगणचा 'में ऐसा ही हूँ' चित्रपट

अभिनेता अजय देवगणचा 'में ऐसा ही हूँ' चित्रपट

अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री सुष्मिता सेन स्टारर चित्रपट 'में ऐसा ही हूं' २००५ साली प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटात अजयने एक मानसिक रूग्ण असल्याची भूमिका पार पाडली होती. मानसिक रूग्ण असून सुद्धा आपल्या मुलीला मिळवण्याची जिद्द चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे.