Gudi Padwa 2024: गुढीपाडव्यानिमित्त खास 'हे' मराठमोळे दागिने परिधान करा
सणावाराला छान दिसण्यासाठी दागिने सौंदर्यात भर घालतात. त्यामुळे स्त्रिया दागिन्यांना कायमच पसंती देतात. या गुढीपाडव्यासाठी खास मराठी पारंपारिक दागिन्यांची माहिती जाणून घेऊयात.
चैत्र महिन्यातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. वसंत ऋतूचं होणार आगमन आणि गुढीपाडव्याचा सण महाराष्ट्रीय मोठ्या थाटामाटात साजरा करतात. गुढीपाडवा हा मराठी नववर्षातील पहिला सण असून साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. असं म्हटलं जातं की या दिवशी एखादी वस्तू, किंवा सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.
1/7
चिंचपेटी
2/7
3/7
कोल्हापुरी साज
हा अत्यंत लोकप्रिय असा दागिन्याचा प्रकार आहे. लाखेवर तयार केलेला हा या दागिन्यात कमळ, मासा, नाग अशा विविध आकाराचे नक्षीकाम यावर केले जाते. पुर्वीच्या काळी ठुशी प्रमाणे कोल्हापुरी साज हा विवाहीत स्त्रियांच्या आवडीचा दागिना म्हटलं जात असतं. या गुढीपाडव्याला मराठमोळ्या लुकसाठी कोल्हापुरी साज हा उत्तम पर्याय आहे.
4/7
नागोत्र
हाताच्या दंडावर हा दागिना घातला जातो. बाजूबंद या प्रकारातील हा दागिना असून तो नागाच्या वेटोळ्याच्या आकाराप्रमाणे दिसणारा दागिना म्हणजे नागोत्र. याचाच दुसरा प्रकार म्हणजे नागबंद. फणा काढलेल्या नागाच्या आकाराचा दागिना म्हणून त्याला नागबंद असेही म्हणतात. खास नऊवारी साड्यांवर हा दागिना बायका आपल्या दंडावर मिरवीत असे. वाकी, वेळा आणि तोळेबंद हे बाजूबंदाचे वेगळे प्रकार आहेत.
5/7
गोठ
बांगड्यांचे अनेक प्रकार आहेत. पाटल्या, तोडे यांप्रमाणे गोठ हा देखील बांगड्यांचा प्रकार आहे. सणावाराला किंवा लग्नकार्यात पुर्वीच्या स्त्रिया हातात गोठ घालत असे. सोन्याच्या धातूचं जाडसर कडं अशी साधारण गोठ या दागिन्याची रचना असते. हिरव्या बांगड्यामध्ये सोनेरी जाडसर असा हा गोठ पारंपारिक लुकला जास्त शोभून दिसतो.
6/7