IND vs NZ: हे 5 खेळाडू ठरले टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार!

न्यूझीलंड विरूद्धचा दुसरा टी20 सामना टीम इंडियाने (Team India) 65 धावांनी जिंकला आहे. या विजयानंतर टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दुसरी टी-20 मॅच खिशात घातली. या सामन्यात टीम इंडियाचे असे 5 खेळाडू आहेत जे या विजयाचे शिल्पकार ठरलेत.

Nov 20, 2022, 22:30 PM IST
1/5

सूर्यकुमार यादव

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा खरा हिरो ठरला तो सूर्यकुमार यादव. या सामन्यात सूर्यकुमार यादवने 51 बॉलमध्ये नाबाद 111 रन्स केले. या खेळीत त्याने 11 फोर आणि 7 सिक्स लगावले.

2/5

दीपक हुड्डा

या सामन्यात दीपक हुडाला फलंदाजीमध्ये जास्त कमाल दाखवता आली नाही. मात्र त्याने गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली. दीपक हुडाने 2.5 ओव्हर टाकत 4 विकेट्स घेतले.

3/5

युझवेंद्र चहल

T20 वर्ल्डकप 2022 मध्ये एकही सामना न खेळलेल्या युझवेंद्र चहलने या सामन्यात उत्तम गोलंदाजी केली. चहलने 4 ओव्हरमध्ये 26 रन्स देत 2 विकेट्स घेतलेत.

4/5

मोहम्मद सिराज

मोहम्मद सिराजनेही या सामन्यात चांगला खेळ करत 2 विकेट घेतल्या. मोहम्मद सिराजने 4 ओव्हरमध्ये केवळ 24 रन्स दिले.

5/5

ईशान किशन

या सामन्यात ओपनर म्हणून खेळणाऱ्या इशान किशनने टीमला चांगली सुरुवात करून दिली. इशान किशनने 31 बॉल्समध्ये 36 रन्स करून बाद झाला.