IPL 2023 Final : आयपीएलच्या फायनलवर पावसाचं सावट; सामना रद्द झाल्यास ही टीम होणार विजयी!

CSK vs GT IPL 2023 Final : गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये आयपीएलचा ( IPL 2023 ) फायनल सामना रंगणार आहे. मात्र जर या सामन्यात पाऊस पडला तर? 

May 27, 2023, 23:08 PM IST
1/6

 2022 मध्ये फायनलसाठी रिझर्व-डे ठेवण्यात आला होता. मात्र यंदाच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये कोणताही रिझर्व-डे ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे पाऊस पडला तर चित्र कसं असेल, असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.

2/6

आयपीएलच्या नियमांनुसार सामना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त 2 तास उपलब्ध असणार आहेत.

3/6

गुजरात आणि चेन्नई यांच्यातील फायनल सामन्यात पाऊस आला तर रात्री 9.40 पर्यंत वाट पाहिली जाईल. त्यापूर्वी हा सामना सुरु झाला तर तो 20 ओव्हर्सचाच खेळवला जाणार आहे.

4/6

रात्री 9.40 नंतर सामना सुरु झाला तर ओव्हर्स कमी करण्यात येतील. हा सामना 11.56 पर्यंत खेळवला गेला नाही तर सगळं गणित फिस्कटणार आहे. 

5/6

नियमानुसार, आयपीएलचा फायनल सामना पाच ओव्हर्सचा झाला पाहिजे. त्यासाठी रात्री 11.56 ही वेळ देण्यात आलीये. पण तरीही सामना झाला नाही तर या फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. 

6/6

त्यामुळे जर पावसामुळे हा सामना झाला नाही तर गुजरात टायटन्सला आयपीएल 2023 चा विजेती टीम म्हणून घोषित केलं जाईल.