किंकाळ्या, भीती आणि खवळलेला समुद्र; जपानमध्ये भूकंप आला त्या क्षणाचे Photo काळजात धस्स करणारे

Japan Earthquake : सोमवारी आलेल्या या 7.5 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळं जपानमध्ये शेकडो घरं पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, रक्त गोठवणारी थंडी असूनही नागरिकांना नाईलाजानं घराबाहेर मोकळ्या जागेवर यावं लागलं.   

Jan 02, 2024, 07:48 AM IST

Japan Earthquake : जपानच्या  इशिकावा प्रांतातील नाटो येथे 2024 च्या पहिल्याच दिवशी, अर्थात 1 जानेवारी 2024 रोजी एक महाप्रचंड भूकंप आला आणि देशभरात भीतीची लाट पाहायला मिळाली. 

 

1/7

त्सुनामीचा इशारा

Japan Earthquake tsunami alert latest photos

Japan Earthquake : भूकंपाची तीव्रता पाहता प्रशासनानं जपानसह दक्षिण आणि उत्तर कोरिया आणि नजीकच्या देशांना त्सुनामीचा इशारा दिला. 

2/7

मंदिरातील खांबसुद्धा कोसळले

Japan Earthquake tsunami alert latest photos

जपानच्या कनाजावा भागामध्ये एका मंदिरातील मूर्ती आणि प्रवेशद्वारं कोसळली. मंदिरातील खांबसुद्धा कोसळले.   

3/7

रस्त्यांनासुद्धा मोठाल्या भेगा

Japan Earthquake tsunami alert latest photos

भूकंप इतका मोठा होता की जपानमध्ये रस्त्यांनासुद्धा मोठाल्या भेगा पडल्या. 

4/7

रस्ते दिसेनासे झाले

Japan Earthquake tsunami alert latest photos

इशिकावा प्रांतातील वजिमा भागामध्ये काही ठिकाणी रस्ते दिसेनासे झाले तर, काही भागांमध्ये वाहनांचं नुकसान झालं. अनेक भागांशी असणारा संपर्कही तुटला. 

5/7

शहरं उध्वस्त

Japan Earthquake tsunami alert latest photos

भूकंपामुळंजपानमध्ये अनेक घरं, संसार उध्वस्त झाले. येत्या काळात या सर्व परिसराला पुन्हा उभं करण्यासाठी कैक दिवसांचा काळ लागणार आहे. 

6/7

आगीची दुर्घटना

Japan Earthquake tsunami alert latest photos

यंदाच्या वर्षाचा पहिलाच दिवस जपानच्या नागरिकांसाठी संकटांचा होता. कारण, भूकंपानंतर इशिकावा प्रांतातीस एका नागरी वस्तीमध्ये आगीची दुर्घटनाही घडली. 

7/7

भयभीत करणारं दृश्य

Japan Earthquake tsunami alert latest photos

अतिशय मोठ्या नैसर्गित आपत्तीचा सामना करत असताना भूकंपाचा हादरा बसला त्यावेळी जीव वाचवण्यासाठी जपानच्या नागरिकांनी जीवाच्या आकांतानं मदतीसाठी हाका मारल्या, यावेळी इथं भयभीत करणारं दृश्य होतं. (सर्व छायाचित्र- रॉयटर्स/ पीटीआय )