यापेक्षा स्वस्त आणखी काय! Jio ने जाहीर केला सर्वात स्वस्त प्लॅन, Jio Cloud चा अॅक्सेसही मिळणार

या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटा, एसएमएस आणि इतर सुविधा मिळतात. याच्या पूर्ण व्हॅलिडिटीमध्ये 2.5 जीबी डेटा मिळतो.   

| Aug 14, 2024, 13:50 PM IST

या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटा, एसएमएस आणि इतर सुविधा मिळतात. याच्या पूर्ण व्हॅलिडिटीमध्ये 2.5 जीबी डेटा मिळतो. 

 

1/9

जिओच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक ऑफर्स आहेत. यामध्ये कंपनी स्वस्त, महाग असे अनेक प्लॅन ऑफर करते.   

2/9

असाच एक 75 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये 23 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.   

3/9

या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटा, एसएमएस आणि इतर सुविधा मिळतात. याच्या पूर्ण व्हॅलिडिटीमध्ये 2.5 जीबी डेटा मिळतो.   

4/9

रोज तुम्हाला 100 MB डेटा मिळेल. तसंच 200 MB डेटा अतिरिक्त मिळतो.   

5/9

यामध्ये युजर्सना अनलिमिटेड वॉईस कॉलिंग आणि 50 एसएमएस मिळतात. यासह कंपनी अतिरिक्त बेनिफिट्सही देतं.   

6/9

यामध्ये तुम्हाला Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चा अॅक्सेस मिळतो. डेटा लिमिट संपल्यानंतर तुम्हाला 64Kbps च्या स्पीडने डेटा मिळेल.   

7/9

लक्षात ठेवा की, हा प्लॅन सर्व ग्राहकांसाठी नाही. कंपनीने हा प्लॅन फक्त जिओ फोन युजर्ससाठी लाँच केला आहे. त्यामुळे फक्त त्यांनाच फायदा मिळेल.   

8/9

याशिवाय कंपनी 91 रुपयांचा प्लॅनही ऑफर करते. यामध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यामध्ये तुम्हाला 75 रुपयांच्या प्लॅनमधील बेनिफिट्सच मिळतात.   

9/9

जर तुम्ही जास्त डेटा वापरत असाल तर कंपनीचा 125 रुपयांचा प्लॅन ट्राय करु शकता. यामध्ये डेली 500MB डेटा मिळतो. याची व्हॅलिडिटी 23 दिवसांची आहे.