IPL 2024 : आयपीएल प्लेऑफपूर्वी मोठी घडामोड, सात खेळाडू अचानक मायदेशी रवाना; कारण काय?

English Palyers will return home : येत्या 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं गेलं आहे. त्यामुळे आता इंग्लंडने मोठा निर्णय घेतलाय.

| May 13, 2024, 20:17 PM IST

Jos Buttler has left for England : इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना सक्त ताकीद दिली होती. त्यामुळे आता इंग्लंडच्या खेळाडूंनी घराकडे पायवाट सुरू केलीये.

1/7

इंग्लंड संघ 22 मे पासून पाकिस्तानविरुद्ध 4 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.

2/7

आगामी टी-20 विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. 

3/7

त्यामुळेच, आगामी पाकिस्तानविरुद्ध मालिकेच्या दृष्टीकोनातून इंग्लंडचे खेळाडूंनी मायदेशी परतण्यास सुरुवात केली आहे.

4/7

यामध्ये मोईन अली, जॉस बेअरस्टो, जॉस बटलर, सॅम करन, विल जॅक्स, फिल सॉल्ट आणि रीस टोपली यांचा समावेश आहे.

5/7

राजस्थानचा स्टार फलंदाज जॉस बटलर याने आज राजस्थानला निरोप दिलाय. तो उर्वरित हंगामात खेळताना दिसणार नाही.

6/7

तर आरसीबीचे दोन स्टार खेळाडू विल जॅक्स आणि रीस टोपली यांनी देखील बंगळुरू संघाला रामराम ठोकला आहे.

7/7

तसेच इंग्लंडचे उर्वरित खेळाडू आठवड्याच्या शेवटी यूकेमध्ये परतण्याची अपेक्षा आहे.