KGF Chapter 2 फेम अभिनेता यशचा नव्या घरात प्रवेश; पाहा त्याचा आशियाना

Jul 02, 2021, 16:29 PM IST
1/7

KGF Chapter 2 फेम अभिनेता यशचा नव्या घरात प्रवेश; पाहा त्याचा आशियाना

फक्त कन्नड कलाविश्वच नव्हे, तर जगभरातील अनेक चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता यश याच्या जीवनात आणखी एक सुखद टप्पा आला आहे. हा टप्पा म्हणजे नव्या घरात प्रवेश करण्याचा. नुकतेच सोशल मीडियावर यश आणि त्याच्या पत्नीचे त्यांच्या कुटुंबासह काही सुरेख फोटो व्हायरल होत आहेत.   

2/7

KGF Chapter 2 फेम अभिनेता यशचा नव्या घरात प्रवेश; पाहा त्याचा आशियाना

नव्या घरात वास्तव्यास जाण्याचा आनंद यश आणि त्याच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.   

3/7

KGF Chapter 2 फेम अभिनेता यशचा नव्या घरात प्रवेश; पाहा त्याचा आशियाना

ट्विटरवर काही फॅन पेजेसकडून यशच्या नव्या घराचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. चाहत्यांच्या नजरेस पडताच त्याचे हे फोटो क्षणार्धात व्हायरल झाले आहेत.   

4/7

KGF Chapter 2 फेम अभिनेता यशचा नव्या घरात प्रवेश; पाहा त्याचा आशियाना

सूत्रांच्या माहितीनुसार यशनं बंगळुरू येथील प्रेस्टीज गल्फ अपार्टमेंट येथे नवं घर खरेदी केलं आहे. या घराते अंतरंग पाहून हा जणू काही एक महालच आहे अशीच प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली आहे.   

5/7

KGF Chapter 2 फेम अभिनेता यशचा नव्या घरात प्रवेश; पाहा त्याचा आशियाना

नव्या घरात प्रवेश केल्यावर यशनं एका पूजेचंही आयोजन केलं होतं असं म्हटलं जात आहे.   

6/7

KGF Chapter 2 फेम अभिनेता यशचा नव्या घरात प्रवेश; पाहा त्याचा आशियाना

देवाच्या आराधनेनं या नव्या वास्तूत यशला त्याच्या नावात असल्याप्रमाणेच कारकिर्दीत आणखी यश लाभो अशाच शुभेच्छा चाहत्यांनी दिल्या आहेत.   

7/7

KGF Chapter 2 फेम अभिनेता यशचा नव्या घरात प्रवेश; पाहा त्याचा आशियाना

'KGF: Chapter 1' या चित्रपटाला विक्रमी यश मिळाल्यानंतर यश आता याच चित्रपटाच्या पुढच्या भागासाठी तयारी करत आहे. 9 सप्टेंबरला त्याचा 'KGF: Chapter 2' हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. (सर्व छायाचित्र - ट्विटर)