जगातील सर्वोत मोठं हिंदू मंदिर, थेट रामायणाशी संबंध

कंबोडियामधील अंगकोर वाट हे जगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर अतिशय सुंदर आणि प्रभावी आहे. 

Aug 14, 2024, 13:17 PM IST
1/6

अंगकोर वाट हे मंदिर सुमारे 400 एकरमध्ये पसरलेलं आहे. त्यामध्ये 70 पेक्षा अधिक मंदिर असल्याचे सांगितले जाते.  या मंदिराचा आकार आणि रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे.    

2/6

ख्मेर साम्राज्याने 12 व्या शतकात हे मंदिर बांधले होते आणि ते भगवान विष्णुला समर्पित केले गेले.   

3/6

अंगकोर वाटच्या भिंती 1200 चौरस मीटर पसरलेल्या आहेत.  यावर बेस रिलीफ कोरीव काम केलेले आढळून येते.  यामध्ये मंदिराच्या नक्षीकामामध्ये रामायण आणि महाभारत यांसारख्या प्रसिद्ध हिंदू महाकाव्यांचे चित्रण केले आहे.   

4/6

अंगकोर हे नाव ख्मेर शब्द नोकोर या शब्दावरून आला आहे. ज्याचा अर्थ राज्य असा आहे. हे संस्कृत शब्द नगर पासून आले ज्याचा अर्थ शहर असा आहे. 

5/6

अंगकोर हे मंदिर प्रथम भगवान विष्णूंसाठी बांधण्यात आले होते पण त्यानंतर जयवर्मन सातव्याने राज्य केले तेव्हा त्याचे बौद्ध मंदिरात रूपांतर करण्यात आले. 

6/6

अंगकोर वाट मंदिराला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. ज्यामधून सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व दर्शवले आहे