दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला दाक्षिणात्य अभिनेता; पत्नी 1500 कोटींची मालकीण! पाहा Photos

1500 Crore Property: 3 मार्च रोजी लग्न झालेल्या या दाक्षिणात्य अभिनेत्याच्या पत्नीची संपत्तीही चर्चेचा विषय ठरत आहे. या अभिनेत्याच्या पत्नीचंही हे दुसरं लग्न असून तिची एकूण संपत्ती 1500 कोटी रुपये इतकी आहे. कोण आहे हा अभिनेता आणि त्याच्या या दुसऱ्या पत्नीकडे इतकी संपत्ती कशी काय आहे जाणून घेऊयात...

Mar 07, 2023, 16:31 PM IST

1500 Crore Property: 3 मार्च रोजी लग्न झालेल्या या दाक्षिणात्य अभिनेत्याच्या पत्नीची संपत्तीही चर्चेचा विषय ठरत आहे. या अभिनेत्याच्या पत्नीचंही हे दुसरं लग्न असून तिची एकूण संपत्ती 1500 कोटी रुपये इतकी आहे. कोण आहे हा अभिनेता आणि त्याच्या या दुसऱ्या पत्नीकडे इतकी संपत्ती कशी काय आहे जाणून घेऊयात...

1/8

Manchu Manoj And Mounika Reddy Wedding

दोघांचही हे दुसरं लग्न... दोघांच्या प्रेमस्टोरीबद्दल मागील बऱ्याच काळापासून चर्चा होती. आता 3 मार्च रोजी दोघेही लग्नबंधनात अडकले. मात्र लग्नानंतर तो दाक्षिणात्य अभिनेता असूनही त्याच्याऐवजी तिच्या संपत्तीचीच जास्त चर्चा आहे. तिची संपत्ती तब्बल 1500 कोटी रुपये इतकी आहे. जाणून घेऊयात तिच्या या संपत्तीसंदर्भातील सविस्तर माहिती...

2/8

Manchu Manoj And Mounika Reddy Wedding

दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेता मांचू मनोज पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकला आहे. मांचू मनोजने भूमा मोनिका रेड्डीबरोबर लग्न केलं आहे. फिल्म नगरमध्ये मांचू निलयममध्ये हा लग्न सोहळा पार पडला.

3/8

Manchu Manoj And Mounika Reddy Wedding

मांचू मनोज त्याच्या लग्नामुळे मागील काही दिवसांपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच चर्चेच्या केंद्रस्थानी होती. हे मांचूचं दुसरं लग्न आहे. मांचूची दुसरी पत्नी मोनिका ही दिवंगत नेते भूमा नागिरेड्डी यांची कनिष्ठ कन्या आहे. 

4/8

Manchu Manoj And Mounika Reddy Wedding

मंचू मनोजचा लग्नसोहळा मोहन बाबूची मुलगी मंचू लक्ष्मीच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. मांचू निलयम असं मंचू लक्ष्मीच्या बंगल्याचं नावं आहे. सोशल मीडियावर आता मांचू मनोज भूमा मोनिका रेड्डी यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

5/8

Manchu Manoj And Mounika Reddy Wedding

सोशल मीडियावर भूमा मोनिका रेड्डीच्या संपत्तीचीही तुफान चर्चा आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका वृत्तानुसार मोनिका एकूण 1500 कोटींची मालकीण आहे. भूमा मोनिका रेड्डीच्या नावावर अनेक कमर्शियल प्रॉपर्टी आहेत. अलागड्डा, कुरनूलमध्ये या सर्व स्थावर मालमत्ता आहेत.

6/8

Manchu Manoj And Mounika Reddy Wedding

मनोजप्रमाणेच भूमा मोनिका रेड्डीचेही हे दुसरे लग्न आहे. या दोघांच्या अफेरची मागील काही वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये चांगलीच चर्चा होती. भूमा मोनिका रेड्डीने आपल्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला आहे. 

7/8

Manchu Manoj And Mounika Reddy Wedding

भूमा मोनिका रेड्डी सध्या राजकीय क्षेत्रात सक्रीय होण्यासंदर्भात प्रयत्नशील आहे. मनोजने यापूर्वी 2015 मध्ये हैदराबादमध्ये राहणाऱ्या प्रणती रेड्डीबरोबर लग्न केलं होतं. चार वर्षानंतर म्हणजेच 2019 साली मनोजने घटस्फोट घेतला. 

8/8

Manchu Manoj And Mounika Reddy Wedding

मनोजची पहिली पत्नी प्रणती रेड्डी आणि भूमा मोनिका रेड्डी या एकाच कुटुंबातील असल्याचं सांगितलं जातं. मात्र मनोज सुरुवातीपासूनच भूमा मोनिका रेड्डीचा मोठा समर्थक होता. त्यामुळेच या दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये होती.