प्रियंका चोप्रा Miss World झाली तेव्हा कसा दिसायचा निक जोनस? Photo पाहून तुम्ही पण व्हाल अवाक्

Entertainment News : देसी गर्ल प्रियांका चोप्रा वयाच्या 19 व्या वर्षी Miss World झाली होती. तिने अमेरिकन सिंगर निक जोनसशी लग्न केलं आहे.  प्रियंका चोप्रा Miss World झाली तेव्हा निक जोनस कसा दिसायचा, हे दाखविणारा त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Jun 11, 2023, 17:06 PM IST

Entertainment News : बॉलीवूड आणि हॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा बहीण परिणीता चोप्राच्या साखरपुड्यानंतर लॉस एंजेलिस परतली आहे. तिने अमेरिकन सिंगर निक जोनसशी लग्न केल्यानंतर ती लॉस एंजेलिसला स्थायिक झाली आहे.

1/13

प्रियांका आणि निक कायम चर्चेत असतात. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे त्यांच्यामधील अंतर...प्रियांकापेक्षा निक वयाने खूप लहान आहे.   

2/13

प्रियांका चोप्राने नुकतीच तिचे वडील डॉ. अशोक चोप्रा यांच्या पुण्यतिथीनिमित्त लॉस एंजेलिसच्या घरात विशेष पूजा केली. 

3/13

 कर्करोगाशी प्रदीर्घ लढा दिल्यानंतर 2013 मध्ये अशोक चोप्रा यांचं निधन झालं. दरम्यान अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर पूजेचे फोटो आणि मालतीचा फोटो शेअर केला आहे. 

4/13

उत्तर प्रदेशातल्या बरेली शहरात प्रियांकाचा जन्म झाला.  2000 मध्ये वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी तिने मिस वर्ल्डचा (Miss World) आपलं नाव कोरलं.

5/13

त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपटांनतर हॉलिवूडमध्येही तिने आपला ठसा उमटवला. 

6/13

जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन आणि बॉबी देओल यांचा दोस्ताना या चित्रपटातील प्रसिद्ध गाणं देसी गर्लनंतर तिला देसी गर्ल अशी ओळख मिळाली.   

7/13

निकने प्रियांकाल प्रपोज केल्यानंतर त्यांनी एकमेकांना तीन वर्षे डेट केलं. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. 

8/13

राजस्थानमधील जोधपूरमध्ये 2018 मध्ये या दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने थाट्यात लग्न केले.

9/13

या दोघांमध्ये तब्बल 11 वर्षांचं अंतर आहे. याचा अर्थ जेव्हा प्रियांका 2000 मध्ये मिस वर्ल्ड झाली तेव्हा निक 8 वर्षांचा होता. 

10/13

प्रियांकाच्या सासूनेही याबद्दल सांगितले आहे. 2000 मध्ये मीस वर्ल्डच्या सोहळ्याच्या वेळी निकची आई, वडील आणि भाऊ त्या सोहळ्याला गेले होते. निक 8 वर्षांचा होता तर निकचे भाऊ 8-9 वर्षांचे होते.   

11/13

आता प्रियांका चोप्रा ही 40 वर्षांची आहे तर निक 29 वर्षांचा आहे. ते दोघे लॉस एंजेलिस सुखाचा संसार करत आहेत. 

12/13

सोशल मीडियावर त्यावेळचा निकचा एक फोटो व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत.   

13/13

सरोगसीच्या मदतीनं निक आणि प्रियांका 2021 मध्ये आई-वडील झाले. त्यांनी मुलीचं नाव ही हटके ठेवलं, मालती मेरी चोप्रा जोनस असं आहे.