वन नेशन, वन इलेक्शन; भाजपला काय फायदा होणार?

देशात लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता आहे.  मोदी सरकार 'एक देश एक निवडणूक' विधेयक आणणार आहे. 

Aug 31, 2023, 23:59 PM IST

one nation one election : महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकाही एकत्रित होतील, अशी चिन्हं आहेत.. कारण केंद्र सरकारच्या वतीनं लवकरच वन नेशन, वन इलेक्शन विधेयक संसदेत मांडण्यात येणार आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास भाजपला कायय फायदा होणार?

1/7

 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे मुद्दे वेगवेगळे असतात.  एकाचवेळी निवडणुका घेतल्यास जनमतावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती वाटत असल्यानं काही राजकीय पक्षांनी त्याला विरोध केलाय. 

2/7

विधी आयोगाच्या शिफारशीनुसार देशात दोन टप्प्यांत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होऊ शकतात.

3/7

नोव्हेंबर-डिसेंबर 2023मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहेत

4/7

केवळ हरियाणामध्ये भाजपला सत्ता टिकवता आली.

5/7

गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये निवडणुका झाल्या.

6/7

लोकसभा निवडणुकीत याच ३ राज्यांतील 95 टक्के जागा भाजपनं जिंकल्या.

7/7

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या सहा महिने आधी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात निवडणुका झाल्या. या तिन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची हार झाली