दगडू अडकणार लवकरचं लग्नबंधनात ; कोण आहे प्रथमेश परबची खरी प्राजु ?

महाराष्ट्राचा लाडका दगडू लवकरचं लग्न करणार आहे. अभिनेता प्रथमेश परबची होणारी बायको प्रोफेशनने आहे..... 

Jan 02, 2024, 10:10 AM IST

टाइमपास . बालक -पालक यांसारख्या चित्रपटातुन घराघरात पोहचलेला प्रथमेश परब लवकरचं लग्न करणार आहे केळवणाचे फोटो शेअर करत प्रथमेशने सर्वाना सांगितली गोड बातमी. 

1/8

रिअल लाईफ प्राजु

आईबाबा अन साईबाबा शपथ हीच पोरगी पाहिजे आपल्याला ' असं म्हणणाऱ्या दगडूला त्याची रिअल लाईफ प्राजु अखेर भेटली.  

2/8

अभिनेता प्रथमेश परब हा लवकरच बोहल्यावर चढणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याने यांबद्दल सांगितलं आहे.

3/8

कोण आहे प्रथमेशची रिअल लाईफ प्राजु

गेल्यावर्षी सोशल मीडियावर प्रथमेशने एक पोस्ट शेअर करत त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. तो  क्षितीजा घोसाळकरला डेट करत आहे.  त्याने#pratija  असं कॅपशन दिलं होतं

4/8

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रथमेशची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. त्याने सोशल मीडियावर केळवनाचे  फोटो शेअर करत लवकरच लग्न करणार आहोत असं सांगितलं आहे .  

5/8

फोटो शेअर करत प्रथमेशने दिलं हे कॅपशन ...

#pratija चं ठरलंय हा! बाकी तारीख लवकरच कळवतो. (PS- तारीख खूपच Special आहे ! Hint caption मध्येच आहे. Comment मध्ये guess करा.) तोवर..... नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा Happppppy "2024"  

6/8

कोण आहे क्षितीजा घोसाळकर ?

ही बायोटेक्नॉलॉजिक , सोशल वर्क आणि फॅशन डिझायनर सुद्धा आहे . प्रथमेशच्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रीमियमला  क्षितीजाने हजेरी लावली होती.

7/8

प्रथमेश आणि  क्षितीजाचे सोशल मिडयावर अनेक फोटो व्हायरल होत असतात.या फोटोंना दोघेही #paratija असं कॅप्शन देतात. 

8/8

नवीन चित्रपट

 प्रथमेशचा 'डिलिव्हरी बॉय'  हा चित्रपट  लवकरचं प्रदर्शित होणार आहे.