महिंद्रा थार, ट्रॅक्टर अन् 20 दुचाकी... बैलगाडा शर्यतीत कोट्यावधी रुपयांच्या बक्षिसांची खैरात

उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत खेड तालुक्यातील चर्होली येथे पार पडली आहे. माजी सभापती रामदास ठाकूर आणि महेंद्र भाडळे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. तर या स्पर्धेमध्ये विजेत्यांना कोट्यावधींची बक्षिसे ठेवली आहेत.

Mar 31, 2023, 18:12 PM IST
1/6

Maharashtra Kesari bullock cart race

उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत खेड तालुक्यातील चर्होली येथे संपन्न होत आहे. तब्बल पाच दिवस सुरू असलेल्या या बैलगाडा शर्यतींचा आज सेमी फायनल आणि मेगा फायनल सामना संपन्न होत आहे.  

2/6

Bullock cart race

या बैलगाडा शर्यतींचा आनंद घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने बैलगाडा शर्यत प्रेमी आणि गाडामालक दाखल झाले होते.

3/6

Bullock cart competition

बैलगाडा स्पर्धेच्या विजेत्या बैलगाडा मालकांना कोट्यावधी रुपयांच्या बक्षिसांचे वाटप केले जाणार आहे, महिंद्रा थार यासह दोन ट्रॅक्टर आणि 20 टू व्हीलर गाड्या विजेत्या बैलगाडा मालकांनाच बक्षीस स्वरूपात दिल्या जाणार आहेत

4/6

Mahindra Thar Car Prize

खेड तालुक्याचे पंचायत समिती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणीक होण्यासाठी महिंद्रा थार गाडी बक्षिस म्हणून ठेवली आहे, अशी माहिती आयोजक महेंद्र भाडळे यांनी दिली.  

5/6

bail gada sharyat price

12 महिने शेतकरी विविध कारणांमुळे दुःखात असतो. परंतु बैलगाडा शर्यतीत शेतकऱ्याला आनंद मिळत असतो. त्यामुळे महिंद्रा थार गाडी बक्षिस म्हणून ठेवली आहे, असेही महेंद्र भाडळे यांनी म्हटलं आहे.

6/6

bail gada sharyat

शेतकऱ्यांच्या आनंदात भर पडावी म्हणून थार गाडी, दोन ट्रॅक्टर, एक बुलेट आणि 20 दुचाकी बक्षिस म्हणून ठेवण्यात आल्या आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण होणार आहे अशी माहिती आयोजक रामदास ठाकूर यांनी दिली आहे.