राहुल महाजन करणार चौथ्यांदा लग्न? आता नवी जोडीदार कोण, पाहा...

Rahul Mahajan 4th Marriage: माजी भाजप नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन (Rahul Mahajan News) याची अनेकदा चर्चा रंगलेली असते. सध्या त्याच्या इन्स्टाग्रामवरील (Rahal Mahajan Instagram) एक फोटोवरून त्याच्या चौथ्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. यावेळी या फोटोखाली नेटकरी विविध कमेंट्स करताना दिसत आहेत. 

Nov 29, 2023, 12:55 PM IST

Rahul Mahajan 4th Marriage: सेलिब्रेटींच्या घटस्फोटानंतर (Celebrities Divorces in Bollywood) त्यांच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा रंगायला लागते. सध्या राहुल महाजनच्या चौथ्या लग्नाची चर्चा आहे. इन्स्टाग्रामवर त्यानं एक महिलेसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यावरून तो आता परत लग्न करण्याच्या विचारात आहे का अशी सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 

1/8

राहुल महाजन करणार चौथ्यांदा लग्न? आता नवी जोडीदार कोण, पाहा...

rahul mahajan viral news

'बिग बॉस'फेम राहुल महाजन हा कायमच त्याच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चेत असतो. सोशल मीडियावरही त्याचे अनेक फॉलोवर्स आहेत. इन्स्टाग्रामवरही तो आपले अपडेट्स हे शेअर करताना दिसतो. सध्या त्याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर जोरात व्हारयल होताना दिसतो आहे. या फोटोत तो एका महिलेसोबत दिसतो आहे. (Photo: Rahul Mahajan | Instagram)

2/8

राहुल महाजन करणार चौथ्यांदा लग्न? आता नवी जोडीदार कोण, पाहा...

rahul mahajan trending news

राहुल महाजन हा माजी भाजप नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा आहे. 2006 साली प्रमोद महाजन यांचे निधन झाले होते. 

3/8

राहुल महाजन करणार चौथ्यांदा लग्न? आता नवी जोडीदार कोण, पाहा...

rahul mahajan marriage news

राहुल महाजन अनेकदा अनेक वादांमध्येही अडकला होता. 2008 साली आलेल्या बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. या पर्वातही त्याची बरीच चर्चा होती. 

4/8

राहुल महाजन करणार चौथ्यांदा लग्न? आता नवी जोडीदार कोण, पाहा...

entertainment news

त्यानंतर राखी का स्वयंवरप्रमाणे 'राहुल दुल्हनिया ले जाएगा' हा रिएलिटी शो सुरू झाला होता. ज्यात राहुलशी लग्न करण्यासाठी अनेक तरूणी या शोमध्ये सहभागी झाल्या होत्या.  

5/8

राहुल महाजन करणार चौथ्यांदा लग्न? आता नवी जोडीदार कोण, पाहा...

rahul mahajan marathi news

त्याअगोदर त्याचे श्वेता सिंग नामक तरूणीशी लग्न झाले होते. परंतु काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर या रिएलिटी शोमधून त्यानं डिप्पी गांगूली हिच्याशी लग्न केले होते. 

6/8

राहुल महाजन करणार चौथ्यांदा लग्न? आता नवी जोडीदार कोण, पाहा...

rahul mahajan entertainment

परंतु हे लग्न फार काळ टिकले नाही. डिप्पी गांगुलीनं राहुल महाजनवर घरगुती हिंसेंचे आरोप केले होते. त्यानंतर त्या दोघांचा 2015 मध्ये घटस्फोट झाला. डिप्पीने नंतर दुसरे लग्न केले. 

7/8

राहुल महाजन करणार चौथ्यांदा लग्न? आता नवी जोडीदार कोण, पाहा...

rahul mahajan news

त्यानंतर त्यानं 2018 मध्ये तिसरं लग्न केलं. परंतु त्याच्या तिसऱ्या पत्नीशी नतालिया इलिनाशीही त्यानं घटस्फोट घेतला आहे. 

8/8

राहुल महाजन करणार चौथ्यांदा लग्न? आता नवी जोडीदार कोण, पाहा...

rahul mahajan

सध्या त्यानं अनास्तासिया खिझन्याक या महिलेसोबत इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. 'अनास्तासिया सोबत काही आठवणी' असं कॅप्शन त्यानं दिलंय. या फोटोवर कमेंट करत अनेकांनी त्याच्या चौथ्या लग्नाची शक्यता वर्तवली आहे.