राजीनामा पवारांचा... राजीनामा ठाकरेंचा, ठाकरेंनी का दिला होता शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा?

शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावर अखेर पडदा पडलाय... 83 वर्षांच्या पवारांनी मंगळवारी राजीनाम्याची घोषणा केली तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला... कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सगळ्यांनाच रडू कोसळलं...

May 05, 2023, 21:03 PM IST
1/11

 पवारांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय जाहीर करताच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला... वाय. बी. चव्हाण सेंटरबाहेर आनंदोत्सव साजरा करण्यात आला...  

2/11

यानिमित्तानं आठवण झाली ती आणखी एका राजीनामा नाट्याची... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या राजीनाम्याची... शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातले दोन दिग्गज नेते...

3/11

आपापल्या पक्षावर रिमोट कंट्रोल चालवण्याची दोघांचीही स्टाईल जवळपास सारखीच... त्यामुळं शरद पवारांच्या राजीनामा नाट्यामुळं ठाकरेंच्या राजीनाम्याच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळालाय...

4/11

बाळासाहेब ठाकरेंनी एकदा नव्हे, तर दोनवेळा शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता.  

5/11

1978 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं पूर्ण ताकदीनं 117 उमेदवार मैदानात उतरवले. मात्र केवळ 21 नगरसेवक निवडून आले

6/11

त्यावेळी शिवाजी पार्कवरील मेळाव्यात ठाकरेंनी राजीनामा देण्याची घोषणा केली. 

7/11

मात्र शिवसैनिकांच्या विरोधामुळं बाळासाहेबांना निर्णय मागे घ्यावा लागला

8/11

1992 मध्ये माधव देशपांडे यांनी ठाकरेंवर घराणेशाहीचा आरोप केला

9/11

या आरोपांमुळे व्यथित होऊन बाळासाहेबांनी 'सामना' मुखपत्रात 'शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांचा कुटुंबासह अखेरचा जय महाराष्ट्र' अशी घोषणा केली होती.

10/11

त्यावेळी शेकडो शिवसैनिक मातोश्रीवर धाव घेऊन आक्रोश केला... भर पावसातल्या शिवसैनिकांच्या भावनिक उद्रेकानंतर ठाकरेंना निर्णय बदलावा लागला

11/11

आता शरद पवारांनीही बाळासाहेब ठाकरेंच्याच निर्णयाचा कित्ता गिरवला... पक्षातील नेत्यांच्या भावनांचा मान राखत राजीनाम्याचा निर्णय मागे घेत असल्याचं पवारांनी जाहीर केलं..  इतिहासाची पुनरावृत्ती होते, ती अशी.