चित्रा वाघ, रुपाली चाकणकर यांना टक्कर देणार एकनाथ खडसेंची लेक; शरद पवारांची मोठी खेळी

शरद पवार गटाच्या एनसीपी महिला प्रदेश अध्यक्षपदावर रोहिणी खडसे निवड करण्यात आली आहे. विद्या चव्हाण यांच्या जागेवर खडसे यांची नियुक्ती करण्यात आलेय. 

| Aug 29, 2023, 19:23 PM IST

rohini khadse : राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट  पडले आहेत. दोन्ही गटांकडून महत्वाच्या पदांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. अशातच शरद पवार यांनी मोठी खेळी खेळली आहे. चित्रा वाघ, रुपाली चाकणकर यांना  एकनाथ खडसेंची लेक रोहिणी खडसे टक्कर देणार आहेत. 

 

1/8

एकनाथ खडसे राष्ट्रवादी पक्षात असले तरी अद्याप त्यांच्यावर कोणत्याही मोठ्या पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. त्यातच रोहिणी खडसे यांना संधी मिळाली आहे. 

2/8

चित्रा वाघ महाराष्ट्रातील सर्वात आक्रमक महिला नेत्यांपैकी एक आहेत. शरद पवार यांची साथ सोडून चित्रा वाघ या भाजपत गेल्या आहेत.  

3/8

रुपाली चाकणकर या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. तसेच अजित पवार पवार गटातर्फे त्यांची एनसीपी महिला प्रदेश अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आलेय.  

4/8

शरद पवार यांच्या हस्ते रोहिणी खडसे यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं.

5/8

अजित पवार गटाकडून पवारांवर ओबीसी नेत्यांना टार्गेट केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे पवारांनी ओबीसी उमेदवाराला संधी दिल्याचं बोललं जात आहे. 

6/8

रोहिणी खडसे या एकनाथ खडसे यांच्या  कन्या आहेत.  

7/8

विद्या चव्हाण यांच्या जागेवर रोहिणी खडसेंची नियुक्ती झाली आहे. 

8/8

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटच्या महिला प्रदेश अध्यक्षपदावर रोहिणी खडसे यांची निवड करण्यात आली आहे.