इंटरनेट बँकिंग सेफ्टी; RBIने सांगितले योग्य पर्याय

या पर्यांयांचा वापर नक्की करा 

Sep 23, 2020, 19:22 PM IST
1/5

वेबसाईटचा वापर

वेबसाईटचा वापर

कोणत्याही प्रकारच्या व्यवहारासाठी इंटरनेट बँकिंचा वापर करत असाल तर वेबसाईटचा वापर करा. शिवाय ऑनलाईन शॉपिंग करताना अज्ञात Wi-fiचा वापर करू नका. 

2/5

बॅंकिंग डेटा

बॅंकिंग डेटा

RBIने सांगितल्या प्रमाणे मोबाईल, ई-मेल किंवा पर्समध्ये बँकेचा डेटा ठेवू नका. ऑनलाईन बँकिंगसाठी फक्त सुरक्षित आणि विश्वासार्ह वेबसाइटचा वापरा करा.

3/5

बँकेचे तपशील चोरी झाल्यास

बँकेचे तपशील चोरी झाल्यास

RBI ने एक महत्त्वाची सूचना देखील दिली आहे. पिन, ओटीपी किंवा अन्य महत्त्वाची माहिती कोणासोबतही शेअर करू नका. जर तुमचे डेबिट किंवा क्रेडीट कार्ड चुकून हरवल्यास बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून तात्काळ कार्ड ब्लॉक करून घ्या.

4/5

या ठिकाणी वैयक्तिक माहिती देवू नका

या ठिकाणी वैयक्तिक माहिती देवू नका

कोणत्याही  अनोळख्या व्यक्तीला ई-मेल, फोन किंवा मेसेजच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती देवू नका. शंका असल्यास बँकेच्या अधिकृत नंबरवर संपर्क साधा.  

5/5

ऑनलाईन बँकिंचा वापर करण्यापूर्वी बँकेचं अधिकृत ऍप डाऊनलोड करावा लागतो. मात्र ऍप डाऊनलोड करताना योग्य संकेतस्थळाचा वापर करा.