दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर, World Cup मध्ये केली कॉमेंट्री, आज इंग्लंडला बनवलं विश्वविजेता

इंग्लंड टीमने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत टी-20 वर्ल्ड कप 2022 आपल्या नावावर केला आहे.  या स्पर्धेमध्ये अनेक चुरशीचे सामने पाहायला मिळाले. सर्व टीम तयारीनिशी मैदानात उतरल्या होत्या. अखेर यंदाच्या वर्षीचा टी-20 चॅम्पियन इंग्लंड टीम ठरलीये. अंतिम सामन्यानंतर 'मॅन ऑफ द टूर्नामेंट' आणि 'मॅन ऑफ द मॅच' दोन्ही पुरस्कार मिळवणारा सॅम करन हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. जाणून घेऊया त्याच्याविषयीच्या काही खास गोष्टी.

Nov 13, 2022, 22:29 PM IST
1/5

टी20 विश्व कप 2022 मध्ये सॅमने आपलं नाणं खणखणीत बजावलं आहे. इंग्लंडच्या या विजेतेपदाचा स्टार खेळाडू सॅम दुखापतीमुळे गतवर्षी वर्ल्डकप खेळू शकला नव्हता.

2/5

इंग्लंडचा डावखुरा गोलंदाज सॅम करन इंग्लंडच्या वर्ल्डकपच्या विजयाचा हिरो ठरलाय. या गोलंदाजाने अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध अवघ्या 12 रन्समध्ये 3 विकेट्स घेतलेत. ज्यामध्ये मोहम्मद रिझवान, शान मसूद आणि मोहम्मद नवाज हे खेळाडू होते.

3/5

फायनलच्या सामन्यात सॅमच्या या कामगिरीसाठी त्याला 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून निवडण्यात आलं. सॅम करनने या वर्ल्डकपमध्ये चमकदार कामगिरी करणं सुरूच ठेवलं होतं. 13 विकेट्ससह त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून अवॉर्ड देण्यात आलाय.

4/5

करणने अफगाणिस्तानविरुद्ध धमाकेदार कामगिरी केली होती. या सामन्यात त्याने केवळ 10 रन्स देत 5 विकेट्स घेतले होते.

5/5

गेल्या वर्षी दुखापतीमुळे तो टी-20 वर्ल्डकप खेळू शकला नव्हता. मात्र या स्पर्धेत त्याने इंग्लंडच्या चॅनेलसाठी कॉमेंट्री केली होती. सॅम जवळपास 6-7 महिने मैदानापासून दूर होता. यानंतर करणने मे महिन्यात देशांतर्गत क्रिकेटमधून कमबॅक केलं आणि आता इंग्लंडला दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकवून दिलं.