'बळीराजावरचं संकट दूर कर, समाधानकारक पाऊस पडू दे'...मुख्यमंत्र्यांची भीमाशंकराकडे प्रार्थना

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर (Shree Kshetra Bhimashankar) मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे. राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम सुफलाम होऊदे; राज्यातील सर्व घटकांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे अशी प्रार्थना भगवान भीमाशंकराकडे केल्याचे मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) सांगितलं.

Sep 11, 2023, 16:43 PM IST
1/7

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. यावेळी त्यांच्याबरोबर खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे उपस्थित होते.

2/7

राज्यात पावसाने दडी मारलीय, त्यामुळे शेतकरीराजा संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर बळीराजावरच संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे. राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम सुफलाम होऊदे; राज्यातील सर्व घटकांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली.

3/7

पुजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला. 

4/7

भावीक श्रद्धेने आणि भक्तीभावानं इथं दर्शनाला येत असतात. मी दरवर्षाप्रमाणे यावर्षीही श्रावणी सोमवारी दर्शनासाठी आलो आहे  इथं लाखो भक्त येत असल्याने शासनाने 148 कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

5/7

आतापर्यंत त्यातील 68 कोटी विविध सुविधांवर खर्च करण्यात आला आहे. इथं येणाऱ्या भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही अशा सर्व मूलभूत सुविधा शासनाच्या माध्यमातून दिल्या जातील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

6/7

परिसरात स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि स्नानगृहाची व्यवस्था करण्याचे तसंच परिसरातील आदिवासी पाड्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.  

7/7

जुन्नर आंबेगावचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, खेड उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसिलदार तथा देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त संजय नागटिळक, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे, विश्वस्त मधुकर गवांदे, दत्तात्रय कौदरे, रत्नाकर कोडीलकर आदी उपस्थित होते.