पाच-पाच मिनिटांनी चहा पिता का? ही सवय पडू शकते महागात, जाणून घ्या Side Effect

Tea Side Effect: प्रत्येक घरात तुम्हाला एक चहाप्रेमी सापडेल. थोड्या थोड्या वेळाने चहा प्यायची त्यांना सवय असते. कारण चहामुळे आळस जातो आणि झटपट काम करण्याची ऊर्जा मिळते. हिवाळ्यात तर चहा पिण्याची सवय खूप वाढते. जर तुम्हालाही चहा प्यायची सवय असेल, तर काळजी घ्या. कारण चहा तुमच्या आरोग्याची हानी करू शकतो.

Nov 18, 2022, 20:39 PM IST
1/5

tea, side effects tea, lifestyle, health, milk tea, herbal tea

निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. रमाकांत शर्मा सांगतात की, चहा प्यायल्याने तुम्हाला नक्कीच झटपट ऊर्जा मिळते, पण ती दीर्घकाळ नसते. त्यामुळे काही वेळाने तुम्हाला पुन्हा चहा प्यावासा वाटतो. त्यामुळे चहाचे व्यसन लागते आणि थोड्याथोड्या वेळाने चहा पितो. वे

2/5

tea, side effects tea, lifestyle, health, milk tea, herbal tea

चहामध्ये निकोटीन आणि कॅफिन सारख्या गोष्टी असतात. लेमन टीमुळे तितकं नुकसान होत नाही. पण दुधाचा चहा प्यायल्यास नुकसान होते. यामुळे अॅसिडिटीचा त्रास होऊ लागतो आणि पोटात जळजळ जाणवते. जास्त चहा प्यायल्याने पचनक्रिया बिघडते. त्यामुळे शरीरात अस्वस्थता, मळमळ यासारख्या समस्याही उद्भवू शकतात.

3/5

tea, side effects tea, lifestyle, health, milk tea, herbal tea

चहा प्रेमींना अधिकतर कडक आणि गरम चहा प्यायला आवडतो. गरम चहाचा शरीरातील अंतर्गत अवयवांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे अल्सर होण्याचा धोका वाढतो. ज्या लोकांना आधीच अल्सरची समस्या आहे त्यांनी चहा पिऊ नये.

4/5

tea, side effects tea, lifestyle, health, milk tea, herbal tea

चहामुळे हाडांचे नुकसान होते आणि आतून पोकळ करते. त्यामुळे सांधेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात. झोपेच्या वेळी चहा प्यायल्यास तुमची झोप भंग पावते आणि चिडचिड आणि राग वाढू शकतो.

5/5

tea, side effects tea, lifestyle, health, milk tea, herbal tea

जास्त चहा प्यायल्याने तुमची भूक मंदावते. रिकाम्या पोटी चहा पितो तेव्हा कॅफिन रक्तात झपाट्याने मिसळते. त्यामुळे कधी-कधी अस्वस्थता, बीपीशी संबंधित समस्या जाणवते. म्हणूनच चहा मर्यादित प्रमाणात प्या आणि कधीही रिकाम्या पोटी चहा पिऊ नका.