Share Market : कोट्याधीश होण्यासाठी लावले या शेअर्समध्ये पैसे, आता गुंतवणूकदार होतायत 'कंगाल'

Nov 18, 2022, 17:57 PM IST
1/5

पेटीएम कंपनीचा शेअर नोव्हेंबर 2021 मध्ये भारतीय शेअर बाजारात लिस्ट झाला. एकेकाळी हा शेअर 1,955 रुपयांपर्यंत पोहोचला होता.  त्यावेळी ज्यांनी कुणी या शेतीमध्ये गुंतवणूक केली असेल ते आता मोठ्या घाट्यात असतील. ज्यांनी या शेअरमध्ये त्यावेळी एक लाख रुपये गुंतवले असतील त्याचे आता 40 हजार झाले असतील.

2/5

धानी सर्व्हिसेस (Dhani Servises)

धानी सर्व्हिसेस या कंपनीच्या शेअरमध्येही तेजी पाहायला मिळत नाही.फेब्रुवारी 2021 मध्ये हा शेअर आपल्या सर्वोच्च किमतीवर म्हणजेच 268 रुपयांवर पोहोचला होता. सध्या हा शेअर 48 रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षभरात या शेअरच्या किमती 180.90 रुपयांपर्यंत वधारल्या होत्या.

3/5

3 आय इन्फोटेक (3I Infotech)

3 आय इन्फोटेक (3I Infotech) हा शेअर शुक्रवारी 42 रुपयांवर पोहोचला. डिसेंबर 2021 मध्ये हाच शेअर त्याच्या सर्वोच्च किमतीवर, म्हणजेच 119.30 रुपयांवर पोहोचला होता. आता या शेअरच्या किमतीत तब्बल 52 टक्क्यांपर्यंत कोसळल्या आहेत. 

4/5

आयआरसीटीसी ( IRCTC)

ऑक्टोबर 2021 मध्ये 1279.26 रुपयांपर्यंत मजल मारणारा IRCTC चा शेअर शुक्रवारी कोसळला. शुक्रवारी शेअर मार्केट बंद झाल्यावर हा शेअर 718 रुपयांच्या स्तरावर आला आहे. या शेअरची 52 वीक हाय किंमत 919.70 रुपये आहे. ज्यांनी कुणी 1279 रुपयांना हे शेअर्स विकत घेतले असतील ते आता रेड झोनमध्ये असतील.   

5/5

इन्फोएज ( Infoedge)

इन्फो एज इंडिया कंपनीचे शेअर्स 7,465.40 या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्यानंतर आता कन्सॉलिडेशन फेजमध्ये आहेत. हा शेअर आता 3,900 रुपयांवर आला आहे. वर्षभरात या शेअरच्या किमती तब्बल 36 टक्के कोसळल्या आहेत.