Shoaib ला Sania पत्नी असल्याचं सांगायलाही वाटतेय लाज? लवकरच घटस्फोट? Insta Bio वरुन राडा

Shoaib Malik Divorce With Sania Mirza: भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती शोएब मलिक यांच्या घटस्फोटांच्या चर्चा मागील अनेक महिन्यांपासून सुरु आहेत. मात्र दोघांनीही याबद्दल कोणतंही अधिकृत निवेदन दिलेलं नाही. मात्र आता पुन्हा या दोघांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. या दोघांमध्ये सर्व काही सुरळीत सुरु नसल्याचं शोएबच्या इन्स्टाग्राम बायोमधून दिसत आहे. जाणून घेऊयात घडलंय काय...

| Aug 01, 2023, 10:29 AM IST
1/18

Shoaib Malik Change Instagram Bio Divorce With Sania Mirza

सानिया मिर्झा ही आपली पत्नी आहे असं सांगायलाही पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिकला लाज वाटतेय की काय असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. याचं कारण ठरलं आहे त्याने इन्स्टाग्राम बायोत केलेला एक बदल. जाणून घेऊयात संपूर्ण प्रकरण...

2/18

Shoaib Malik Change Instagram Bio Divorce With Sania Mirza

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक हे दोघे 2010 साली लग्नबंधनात अडकले. सानिया ही भारतीय टेनिसपटू असून शोएब मलिक पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे.

3/18

Shoaib Malik Change Instagram Bio Divorce With Sania Mirza

सानिया मिर्झा आणि शोएब मलिकच्या घटस्फोटाची मागील अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. त्यामुळेच शोएब मलिक आणि सानिया मिर्झा कायम चर्चेत असतात.

4/18

Shoaib Malik Change Instagram Bio Divorce With Sania Mirza

शोएब आणि सानिया त्यांच्या लग्नानंतर 8 वर्षांनी म्हणजेच 2018 रोजी आई-वडील झाले. 2018 मध्ये सानियाने एका मुलाला जन्म दिलं. त्याचं नाव इजहान मिर्झा मलिक असं आहे. 

5/18

Shoaib Malik Change Instagram Bio Divorce With Sania Mirza

मुलाच्या जन्मानंतर शोएब आणि सानिया यांच्यातील संबंध बिघडल्याचं सांगितलं जातं. 

6/18

Shoaib Malik Change Instagram Bio Divorce With Sania Mirza

शोएब आणि सानियाने एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याच्या अनेक बातम्या पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्या.

7/18

Shoaib Malik Change Instagram Bio Divorce With Sania Mirza

शोएब आणि सानिया दोघेही मुलाबरोबरचे अनेक फोटो पोस्ट करतात. मात्र दोघेही वेगवेगळ्या वेळी मुलाबरोबर असतात. 

8/18

Shoaib Malik Change Instagram Bio Divorce With Sania Mirza

शोएब, सानिया आणि त्यांचा मुलगा असे तिघांचे फोटो या दोघांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट फारच क्वचित दिसतात.

9/18

Shoaib Malik Change Instagram Bio Divorce With Sania Mirza

यासंदर्भात शोएब आणि सानिया दोघांनी विचित्र स्पष्टीकरणंही दिली होती. मात्र आता पुन्हा या दोघांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा आहे ती शोएबने बदलेलेल्या त्याच्या इन्स्टाग्राम बायोमुळे.

10/18

Shoaib Malik Change Instagram Bio Divorce With Sania Mirza

सानिया आणि शोएबमध्ये सारं काही ठीक नाही अशी चर्चा सुरु होण्याचं कारण शोएबचा नवा इन्स्टाग्राम बायो आहे. 

11/18

Shoaib Malik Change Instagram Bio Divorce With Sania Mirza

शोएबने पत्नी सानियाचं नाव आपल्या इन्स्टाग्राम बायोमधून हटवलं आहे.

12/18

Shoaib Malik Change Instagram Bio Divorce With Sania Mirza

शोएब मलिकने आपल्या इन्स्टाग्राम बायोमध्ये सानिया मिर्झाचा उल्लेख केला होता. 'हसबण्ड टू अ सुपरवुमेन' असं म्हणत शोएबने सानियाला थेट इन्स्टाबायोमध्ये टॅग केलं होतं.

13/18

Shoaib Malik Change Instagram Bio Divorce With Sania Mirza

मात्र आताचा शोएबचा इन्स्टाग्राम बायो पाहिला तर त्यामधील ही ओळ शोएबने काढून टाकली आहे. शोएबने अचानक अशापद्धतीने सानियाचं नाव आपल्या इन्स्टाग्राम बायोमधून काढून टाकल्याने पुन्हा एकदा या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा जोरात आहे.

14/18

Shoaib Malik Change Instagram Bio Divorce With Sania Mirza

सानिया आणि शोएब लवकरच घटस्फोटाची घोषणा करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 

15/18

Shoaib Malik Change Instagram Bio Divorce With Sania Mirza

शोएबने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये तो सानिया मिर्झाबरोबर दिसत आहे. तो या फोटोंमध्ये पत्नी सानियाबरोबर हसताना दिसत आहे.

16/18

Shoaib Malik Change Instagram Bio Divorce With Sania Mirza

मात्र दुसरीकडे सानियाने मागील अनेक आठवड्यांमध्ये पतीबरोबरचा एकही फोटो पोस्ट केलेला दिसत नाही.

17/18

Shoaib Malik Change Instagram Bio Divorce With Sania Mirza

सानिया मिर्झा ही टेनिसपटू असली तरी तिला क्रिकेटचीही चांगलीच आवड आहे. मागील महिन्यामध्ये तिने, मी पुरुष असते तर क्रिकेटपटू झाले असते असं म्हटलं होतं.

18/18

Shoaib Malik Change Instagram Bio Divorce With Sania Mirza

36 वर्षीय सानिया मिर्झाने काही आठवड्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय टेनिसमधून संन्यास घेतला आहे. आता तिच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली आहे.