'असा क्रूर प्रकार ऐकला नाही!' Miss Switzerland च्या हत्येची जगभर चर्चा, पतीच आरोपी; 'ती' चूक..

Model Brutal Murder By Husband: या सौंदर्यवतीच्या मृतदेहाबरोबर तिच्या पतीने जे काही केलं ते ऐकून प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. एखादी व्यक्ती एवढी क्रूर कशी असू शकते असा प्रश्न हे प्रकरण समोर आल्यानंतर विचारला जात आहे. नेमकं घडलं काय आणि कोणती माहिती समोर आली आहे पाहूयात...

| Sep 13, 2024, 11:06 AM IST
1/14

kristinajoksimovic

या हायप्रोफाइल हत्याकांडाचा तपशील हादरवून टाकणारा असून 'असा क्रूर प्रकार यापूर्वी कुठेही ऐकला नाही' असं अनेकांनी म्हटलंय. नेमकं घडलंय काय जाणून घ्या

2/14

kristinajoksimovic

मिस स्वित्झर्लंड स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्पर्धक राहिलेल्या क्रिस्टीना जोक्सिमोविच नावाच्या सौंदर्यवतीची तिच्या पतीने क्रूरपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

3/14

kristinajoksimovic

बिनिंगेन शहरामध्ये क्रिस्टीना जोक्सिमोविचचा मृतदेह फेब्रुवारी महिन्यामध्ये छिन्नविछिन्न अवस्थेत आढलून आला होता. या 38 वर्षीय सौंदर्यवतीचा मृतदेह 13 फेब्रुवारी रोजी सापडलेला.

4/14

kristinajoksimovic

क्रिस्टीना जोक्सिमोविचचा मृतदेह सापडल्यानंतर तिचा पती थॉमसला पोलिसांनी लगेच अटक केली होती, असं माहिती स्थानिक प्रसारमाध्यांनी दिली होती. त्यानेच पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली.  

5/14

kristinajoksimovic

क्रिस्टीना जोक्सिमोविचची बाजू मांडताना सरकारी वकिलांनी तिच्या पतीला म्हणजेच थॉमसला मानसिक आजार असल्याचा दावा केला आहे.

6/14

kristinajoksimovic

25 ऑगस्ट 2017 रोजी थॉमस आणि क्रिस्टीनाचं लग्न झालं होतं.   

7/14

kristinajoksimovic

वैद्यकीय अहवालामध्ये क्रिस्टीनाचा मृतदेह सुरी, बगेतील मोठी कात्री आणि ब्लेंडरच्या मदतीने कापण्यात आला.  

8/14

kristinajoksimovic

क्रिस्टीना जोक्सिमोविचच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी थॉमसने तिच्या मृतदेहाचे तुकडे चक्क मिक्सच्या भांड्यातून फिरवून द्रव्य स्वरुपात विघटन करण्यासाठी रसायनांचा वापर केला.

9/14

kristinajoksimovic

क्रिस्टीना जोक्सिमोविचवर यापूर्वीही थॉमसने अशाप्रकारे हल्ला केला होता. तिचा गळा पकडून त्याने तिला भिंतीवर आपटलं होतं.  

10/14

kristinajoksimovic

मात्र क्रिस्टीनाने या प्रकरणात पुढे कोणतीही तक्रार न केल्याने प्रकरण नंतर परस्पर सामंजस्याने निवळलं होतं. सोशल मीडियावर ती त्याच्याबरोबरचे तसेच आपल्या भटकंतीचे, सेलिब्रेशनचे छान छान फोटो पोस्ट करायची. यामाध्यमातून सारं काही ठिक असल्याचं दाखवण्याचा तिचा प्रयत्न होता.

11/14

kristinajoksimovic

क्रिस्टीनाने थॉमसच्या या हिंसक वागण्याकडे दुर्लक्ष केलं नसतं तर कदाचित आज ती वाचली असती असं तिच्या चाहत्याचं आता म्हणणं आहे.

12/14

kristinajoksimovic

क्रिस्टीना जोक्सिमोविच मिस नॉर्थवेस्ट स्वित्झर्लंड स्पर्धा जिंकून 2007 च्या मिस स्वित्झर्लंड स्पर्धेत अंतिम स्पर्धक म्हणून पोहोचली होती.

13/14

kristinajoksimovic

क्रिस्टीना जोक्सिमोविच मागील अनेक वर्षांपासून मॉडल्सला प्रशिक्षण देण्याचं काम करत होती.  

14/14

kristinajoksimovic

क्रिस्टीना आणि थॉमसला दोन मुली आहेत. हत्येचा गुन्हा कबूल केल्यानंतर कोर्टाने थॉमसने दाखलेला दयेचा अर्ज फेटाळून लावला आहे.