8 दिवसांसाठी गेल्या आणि 8 महिने अडकल्या, सुनिता विलियम्स 2025 पर्यंत अंतराळात करणार तरी काय?

नासाने दिलेल्या माहितीनुसार सुनीता आणि बुच यांना 2025 च्या सुरुवातीपर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहावे लागेल.

| Aug 26, 2024, 11:14 AM IST

Sunita Williams:नासाने दिलेल्या माहितीनुसार सुनीता आणि बुच यांना 2025 च्या सुरुवातीपर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहावे लागेल.

1/8

8 दिवसांसाठी गेल्या आणि 8 महिने अडकल्या, सुनिता विलियम्स 2025 पर्यंत अंतराळात करणार तरी काय?

Sunita Williams be in space by 2025 do work with Expedition 71 Group Marathi News

Sunita Williams News: नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी साधारण 3 महिन्यांपूर्वी पृथ्वीवरुन उड्डाण घेतले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा (ISS) त्यांचा प्रवास फक्त आठवडाभराचा होता. त्यामुळे दोघांनीही मर्यादित काळापुरत्या लागणाऱ्या वस्तूच आपल्या सोबत ठेवल्या होत्या. पण आता दोघेही 11 आठवड्यांहून अधिक काळ स्पेस स्टेशनवर आहेत. त्यांचा मुक्काम आणखी वाढलाय. 

2/8

पुढील पाच-सहा महिने अंतराळात

Sunita Williams be in space by 2025 do work with Expedition 71 Group Marathi News

नासाने दिलेल्या माहितीनुसार सुनीता आणि बुच यांना 2025 च्या सुरुवातीपर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहावे लागेल. नासाच्या या निर्णयानंतर दोघेही बोईंग स्टारलाइनरऐवजी SpaceX च्या क्रू ड्रॅगन कॅप्सूलमध्ये परततील. दरम्यान सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पुढील पाच-सहा महिने अंतराळात काय करतील? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

3/8

अंतराळ स्थानकावर पाहुण्या

Sunita Williams be in space by 2025 do work with Expedition 71 Group Marathi News

सुनीता विल्यम्स सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाहुण्या आहेत.सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आतापर्यंत इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) वर पाहुणे म्हणून राहत होते. ते एक्सपिडिशन 71 चा भाग नाहीत.

4/8

काय आहे एक्सपिडिशन 71?

Sunita Williams be in space by 2025 do work with Expedition 71 Group Marathi News

एक्सपिडिशन 71 हे स्पेस स्टेशनच्या अधिकृत कर्मचाऱ्यांच्यां कामाचे ठिकाण आहे.एक्सपिडिशन 71 ही 7 अंतराळवीरांची आंतरराष्ट्रीय क्रू आहे. आता सुनिता आणि बुच दोघेही अंतराळवीर एक्सपिडिशन 71 ग्रुपसोबत मिसळले असल्याची माहिती नासाने दिली आहे.

5/8

क्रू मेंबर्स

Sunita Williams be in space by 2025 do work with Expedition 71 Group Marathi News

दोन्ही अंतराळवीरांना फेब्रुवारी 2025 पर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात रहावे लागणार आहे. येथे त्यांना पूर्णवेळ क्रू मेंबर्सप्रमाणे रहावे लागेल. सुनीता आणि बुच यांना औपचारिकपणे SpaceX च्या क्रू-9 अंतराळवीरांसह क्रू मेंबर बनवण्यात आले आहे. क्रू-9 हे 24 सप्टेंबरपर्यंत निघणार आहेत.

6/8

सुनीता विल्यम्स स्पेस स्टेशनवर काय करणार?

Sunita Williams be in space by 2025 do work with Expedition 71 Group Marathi News

क्रू-9 आणि औपचारिक मिशनचा भाग म्हणून, विल्यम्स आणि विल्मोर यांना ISS क्रू करत असलेली सर्व कामे करावी लागतील. स्पेस स्टेशनच्या बाहेर स्पेसवॉक करणे, परिभ्रमण प्रयोगशाळेची देखभाल करणे आणि विज्ञान प्रयोगांचे वेळापत्रक पूर्ण करणे, अशी कामे त्यांना करावी लागतील. स्टारलाइनर अंतराळवीर अशा बदलासाठी तयार असल्याचे नासाने आधीच स्पष्ट केले होते.

7/8

नासाने आधीच तयारी केली होती

Sunita Williams be in space by 2025 do work with Expedition 71 Group Marathi News

अशा परिस्थितीसाठी नासाने दोन्ही अंतराळवीरांना आधीच तयार केले होते. आमच्या क्रूकडे योग्य संसाधने आहेत. हे चाचणी उड्डाण आहे हे जाणूनच आम्ही हा निर्णय घेतलाय. आमच्या क्रू मेंबर्सना दीर्घकाळ ISS वर राहावे लागले त्यांच्याकडे योग्य संसाधने आणि पुरवठा आहे का, याची काळजी घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

8/8

दोघेही प्रशिक्षित

Sunita Williams be in space by 2025 do work with Expedition 71 Group Marathi News

'बुच आणि सुनीता पूर्णपणे प्रशिक्षित आहेत. ते EVA (स्पेसवॉक), रोबोटिक्स आणि आम्हाला त्यांच्याकडून आवश्यक असलेल्या सर्व कामांमध्ये सक्षम आणि कार्यक्षम आहेत', असे 7 ऑगस्टच्या ब्रीफिंग दरम्यान नासाच्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन प्रोग्रामचे मॅनेजर डॅना वेइगल यांनी म्हटले होते.