Thane News : ठाण्यात पाणीपुरवठा बंद, पंधरा दिवसांतून एकदाच....

Thane News : सध्या राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पावसानं सरासरीचा आकडा गाठला आहे. त्यामुळं यंदाचा पाणीप्रश्न मिटला, असाच अनेकांचा समज झाला. पण, पालिका प्रशासनानं मात्र वेगळीच आकडेमोड केल्यातं स्पष्ट होत आहे. पाणीपुरवठ्याच्या बाबतीत ठाणेकरांचं संकट टळलेलं दिसत नाहीये. 

Jul 31, 2023, 10:17 AM IST

Thane News : इथं (Mumbai water supply) मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळं पुढील काही दिवसांत शहरात लागू असणारी पाणीकपात मागे घेतली जाण्याची चिन्हं आहेत. अर्थात याबाबतचा आढावा घेतल्यानंतरच निर्णय होईल. 

1/7

Thane News

Thane people to face zonal water cut latest news

Thane News : असं असतानाच ठाणे मात्र यासाठी अपवाद ठरत आहे. ठाणे महानगरपालिकेनं घेतलेल्या एका निर्णयामुळं नागरिकांना आता पाण्याचं नियोजन करावं लागणार आहे हे आता स्पष्ट होत आहे. 

2/7

ठाणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

Thane people to face zonal water cut latest news

सध्या राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पावसानं सरासरीचा आकडा गाठला आहे. त्यामुळं यंदाचा पाणीप्रश्न मिटला, असाच अनेकांचा समज झाला. पण, पालिका प्रशासनानं मात्र वेगळीच आकडेमोड केल्यातं स्पष्ट होत आहे. पाणीपुरवठ्याच्या बाबतीत ठाणेकरांचं संकट टळलेलं दिसत नाहीये.   

3/7

पंधरा दिवसातून एकदा पाणी बंद

Thane people to face zonal water cut latest news

समाधानकारक पाऊस झालेला असतानाही ठाण्यात तात्पुरत्या स्वरुपात झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळं प्रत्येक विभागात पंधरा दिवसातून एकदा पाणी बंद राहणार आहे. 

4/7

पंपिंगवर परिणाम

Thane people to face zonal water cut latest news

 अतिवृष्टीमुळे ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतील पिसे पंपिंग केंद्र येथे नदीतून येणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर झाडांच्या फांद्या आणि गाळ आहे. ज्यामुळं पंपिंगच्या क्षमतेवर परिणाम होत आहे.   

5/7

पाणीपुरवठ्यात अडचणी

Thane people to face zonal water cut latest news

पिसे आणि टेमघर येथील वीज पुरवठा खंडित होण्यापासून विद्युत यंत्रातील बिघाड होण्याच्या कारणांमुळे शहरास आवश्यक तेवढा पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. 

6/7

अडचणींवर तोडगा

Thane people to face zonal water cut latest news

सरतेशेवटी या अडचणी दूर करण्यासाठी मंगळवार (1 ऑगस्ट) पासून पावसाळ्याचा जोर कमी होईपर्यंत शहरात तात्पुरत्या स्वरूपात विभागनिहाय पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. 

7/7

पाणी जपून वापरा

Thane people to face zonal water cut latest news

महानगरपालिकेच्या या निर्णयाच्या धर्तीवर पंधरा दिवसातून एकदा एकेका विभागाचा पाणी पुरवठा १२ तासांसाठी बंद ठेवण्यात येईल. नागरिकांनी या काळात आवश्यक तो पाण्याचा साठा करून ठेवावा. पाणी काटकसरीने तसेच, गाळून व उकळूनच वापरावं, असं आवाहन महापालिका प्रशासन करत आहे.