पृथ्वीचा गाभा आतल्या आत उलटा फिरतोय? दिवसा रात्र आणि रात्री दिवस होणार? जीवसृष्टी धोक्यात?

पृथ्वीच्या उदरात प्रचंड उलथापालथ सुरु आहे. याचा परिणाम थेट जीवसृष्टीवर होऊ शकतो अशी भिती देखील व्यक्त केली जात आहे.  

Aug 15, 2024, 21:41 PM IST

Earth Rotation : पृथ्वी ही सूर्याभोवती फिरता फिरता स्वत: भोवती देखील फिरतेय. यामुळेच पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतेय. शास्त्रज्ञांनी पृथ्वीबाबत अत्यंत धक्कादायक दावा केला आहे.  पृथ्वीचा गाभा आतल्या आत उलट दिशेने फिरत असल्याचा संशोधकांचा दावा आहे. याचा जीवसृष्टीवर का. परिणाम होणार याबाबत देखील संशोधकांनी भाष्य केले आहे. 

1/7

 पृथ्वीच्या उदरात अत्यंत खळबळजनक हालचाली सुरु आहेत. याचा थेट परिणाम जीव सृष्टीवर होऊ शकतो अशी भिती व्यक्त केली जात आहे. 

2/7

पृथ्वीच्या उदरात घडणाऱ्या या घडामोडींचा थेट परिणाम जीवसृष्टीवर अद्याप अधिक प्रमाणात दिसत नसला तरी, दिवस काही सेकंदांनी कमी होऊ शकतो अशी भिती व्यक्त केली जातेय.

3/7

1991 ते 2023 दरम्यान दक्षिण सँडविच बेटांवर एकामागून एक आलेल्या साधारण 121 भूकंपांचा अभ्यास आणि निरीक्षण संशोधकांनी केलं. पृथ्वीच्या गाभ्यामधील हालचालींचा वेग त्याच्या वर असणआऱ्या द्रवरुपी थराच्या हालचालींमुळं मंदावतोय.

4/7

2010 पासून पृथ्वीच्या पृष्ठावरही त्याचा परिणाम दिसून येण्यास सुरुवात झाली आहे.   पृथ्वीच्या गाभ्यामध्ये असणाऱ्या केंद्रीय थराचा परिणाम त्याच्यावर असणाऱ्या थरांवर दिसून येतो. याशिवाय पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावरही याचे परिणाम होताना दिसत आहे.  

5/7

पृथ्वीचा गाभा आतल्या आत उलट दिशेने फिरत असल्याने पृथ्वीच्या अंतर्गत गाभ्याचा वेग प्रचंड मंदावला आहेय.   

6/7

पृथ्वीचा गाभा आतल्या आत उलट दिशेने फिरत असल्याचे निरीक्षण University of Southern California  नोंदवले आहे. 

7/7

University of Southern California (USC)  या संस्थेने केलेल्या संशोधनातून धक्कादायक निरीक्षण समोर आले आहे.