चॅम्पियन ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाणार का? जय शहांनी एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले...

Jay Shah On Champions Trophy 2025 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचं लक्ष्य असेल आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीवर.. भारतीय संघ तयारीला लागलाय पण टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाणार की नाही? असा प्रश्न कायम आहे.

| Aug 15, 2024, 20:50 PM IST
1/5

चॅम्पियन्स ट्रॉफी

यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानकडून आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये टीम इंडिया खेळणार नाही, असं कठोर भूमिका घेतली आहे. 

2/5

जय शहा

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीवर आता मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या कोणतीही भूमिका घेतलेली नाही, असं वक्तव्य जय शहा यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना केलंय.

3/5

पीसीबी

आशिया कपसाठी भारतीय संघ पाकिस्तानलाही गेला नव्हता. त्यावेळी पीसीबी म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बीसीसीआयसमोर झुकावं लागलं होतं. 

4/5

हायब्रिड मॉडेल

आता पाकिस्तान यजमानपदावर अडून राहिल्याने आयसीसीसमोर हायब्रिड मॉडेलचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, पाकिस्तानने यावर देखील नाराजी दर्शवल्याने बीसीसीआयचा अंतिम काय असेल? असा सवाल विचारला जातोय.

5/5

श्रीलंके सामने होणार?

दरम्यान, जर भारत आणि पाकिस्तानचे सामने हायब्रिड मॉडेलवर झाले तर भारताचे सर्व सामने आशिया कप प्रमाणे श्रीलंकेत होण्याची शक्यता आहे.