अतितणावातून बाहेर पडण्यासाठी करा 'हे' उपाय

Jan 22, 2019, 10:56 AM IST
1/5

अतितणावातून बाहेर पडण्यासाठी करा 'हे' उपाय

कामाच्या व्यापात, नात्यांच्या गोंधळात अनेकदा काहीजण स्वत:लाही विसरुज जातात. स्वत:ला सिद्ध करण्याच्या आणि कधीही न थांबणाऱ्या या स्पर्धेत एका टप्प्यावर मात्र स्वत्व कुठेतरी हरवत चालल्याची भावना येते आणि मग मनावर प्रचंड ताण, दडपण येतं. अनेकदा ही परिस्थिती फार बिघडते, ज्याचा थेट परिणाम हा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही होतो.  अतितणावाच्या परिस्थितीच्या याच लक्षणांपासून दूर राहण्यासाठी किंवा या परिस्थितीतून सावरण्यासाठी असे काही सोपे उपाय आहेत, जे पुन्हा एकदा तुम्हाला नवसंजीवनी देऊन जातील. चला तर मग, अशाच  काही सोप्या आणि तितक्याच फायदेशी उपायांवर नजर टाकूया... 

2/5

अतितणावातून बाहेर पडण्यासाठी करा 'हे' उपाय

सुट्टीवर जा- हा कसा उपाय असं म्हणून हसण्यावारी न जाता याकडे गांभीर्याने पाहा. कामाचा व्याप, मनावर असणारं ओझं, गुंता हे सारंकाही सोडवण्यासाठी स्वत:ला वेळ देणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे सुट्टीवर जाणं हा एक उत्तम पर्याय आहे. काही दिवस रोजच्या धकाधकीपासून दूर राहिल्यास हरवलेला सूर गवसण्यास नक्कीच मदत होईल.   

3/5

अतितणावातून बाहेर पडण्यासाठी करा 'हे' उपाय

वाचन, पूर्ण झोप आणि सकारात्मक दृष्टीकोन- स्वत:ला वेळ देणं म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडत असेल तर त्याचं उत्तर आहे तुमचे छंद जोपासणं. प्रत्येकाचा कल आणि वेगळी अशी आवड असते. ही बाब लक्षात घेत वाचन करणं, चित्र काढणं, नियमितपणे चालण्यासाठी जाणं, व्यायाम करणं या गोष्टी मदतीच्या ठरु शकतात. योगसाधना, विपश्यना यांचीही यामध्ये फार मदत होते. 

4/5

अतितणावातून बाहेर पडण्यासाठी करा 'हे' उपाय

एक पाऊल मागे या- तुम्ही अतितणावाने ग्रासले आहात याचा अर्थ असा होत नाही की तुमच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या कमी होणार आहेत. उलटपक्षी या जबाबदाऱ्या कमी असल्या तरीही मग त्यांचं ओझं वाटू लागेल ज्यापासून तुम्ही पळण्याचा प्रयत्न कराल. ही परिस्थिती टाळण्यासाठी एक पाऊल मागे या, जीवनशैलीचा वेग काही काळ मंदावला तर याचा फायदाच तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे सतत पळण्याची सवय थोडी दूर सारा. 

5/5

अतितणावातून बाहेर पडण्यासाठी करा 'हे' उपाय

इतरांशी संवाद साधा- सोबत असणाऱ्या व्यक्तींवर चीडून काहीच साध्य होणार नाही. किंवा सतत एकटेपणाची साथही तुम्हाला बोचरी वाटेल. त्यामुळे नेमकी कोणती परिस्थिती तुम्हाला सतावत आहे, तुमच्यासोबत काय घडत आहे, याविषयी मित्रमंडळी, साथीदाराशी चर्चा करा. त्यांना परिस्थितीची माहिती द्या. मनावरचा ताण कमी होण्यास यामुळे काही प्रमाणात नक्कीच मदत होईल.