'या' महिन्यात लाँच झालेले ७ स्मार्टफोन

| Mar 06, 2020, 09:31 AM IST
1/7

Realme 6 & Realme 6 Pro

Realme 6 & Realme 6 Pro

रियलमी 6 आणि रिअलमी 6 प्रो एका बजेटच्या कॅटेगिरीत येणारा स्मार्टफोन आहे. या रेंजमध्ये चांगले हँडसेट उपलब्ध होणार आहेत. फोनमध्ये ऑक्टा कोर 2.05GHz च्या प्रोसेससोबत Android V10 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आलं आहे. ये फोन बॅटरी बॅकअप आणि कॅमेरा क्वालिटी अतिशय चांगली आहे. हा स्मार्टफोन 5 मार्च रोजी लाँच झाला आहे. 

2/7

INFINIX S5 PRO

INFINIX S5 PRO

16 MP पॉप ऍपवर सेल्फी कॅमेरा फोन भारतीय मार्केटमध्ये आज 6 मार्चला लाँच होणार आहे. याफोनमध्ये 6.53 इंच फूल HD+ डिस्प्ले दिला आहे. यामध्ये ट्रपल रिअर कॅमेरा फोनमध्ये लूक देण्यात आला आहे. पॉप अप कॅमेरेसोबत येणारा हा सर्वात स्वस्त फोन आहे. याची किंमत जवळपास 10 हजार रुपये असणार आहे. 

3/7

Xiaomi Redmi K30

Xiaomi Redmi K30

शाओमीमध्ये या स्मार्टफोन 4 जी आणि 5 जी वेरिएंटमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये डिस्प्ले खूप महत्वाचा ठरणार आहे. दोन सेल्फी कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहेत. फोनमध्ये रिअर क्वाड कॅमेरा सेटअपमध्ये दिला आहे वर्टिकल पोझिशनमध्ये दिसणार आहे. यासोबतच रेडमी K30 मध्ये डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलं आहे. या फोनमध्ये भारतीय मार्केटमध्ये 12 मार्चमध्ये लाँच करणार आहे. 

4/7

Xiaomi Redmi Note 9

Xiaomi Redmi Note 9

कंपनीने Redmi Note सीरिजच्या या मॉडेलला भारतात 12 मार्चमध्ये लाँच केलं आहे. या सीरिजमध्ये रेडमी नोट 9 आणि रेडमी नोट 9 प्रो सादर केला आहे. हे मार्केटमध्ये Redmi Note 8 आणि Redmi Note 8 Pro ची जागा घेणार आहे. कॅमेरा सेटअप बरोबरच रिफ्रेश करणारे डिस्प्ले आणि इतर फीचर आहेत. यासोबतच फोनमध्ये 90 हर्ट्ज डिस्प्ले आहे. 

5/7

Samsung Galaxy S20 Ultra

Samsung Galaxy S20 Ultra

रिपोर्ट्सनुसार गॅलेक्सी S11 सीरिजमध्ये कॅमेरा स्पेसिफिकेशन्स आणि फीचरमध्ये चांगले अपग्रेडेड गोष्टी पाहायला मिळत आहे. फोनमध्ये अल्ट्राडाय रेझॉल्यूशनसोबत हाय झूम लेवल्सवर रिकॉर्डिंड सपोर्ट देण्यात आलं आहे. यासोबतच फोनच्या रेअर कॅमेरा सेटअपमध्ये एक्स्ट्रा टाइम ऑफ फ्लाइ सेंसर्स देखील आहे. कंपनी या फोनला 15 मार्च लाँच होणार आहे. 

6/7

OPPO Reno 3 Pro

OPPO Reno 3 Pro

कंपनीचा असा दावा आहे की, हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे ज्यामध्ये 44 मेगापिक्सलचा ड्युअल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Oppo Reno 3 Pro ला तीन कलर वेरिएंट्समध्ये लाँच केलं आहे. यामध्ये ऑरोरा ब्लू,  मिडनाइट ब्लॅक आणि स्काय व्हाइट या रंगात लाँच केलं आहे. भारतात याची किंमत ही 30 हजाराहून अधिक असणार आहे. 

7/7

Realme X50 Pro

Realme X50 Pro

या फोनची किंमत जवळपास 38 हजार रुपयांपासून सुरू होते. फोनची बॅटरी 4,200mAh असून यात 65 वॉट सुपर डार्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी आहे. हा 5G स्मार्टफोन आहे. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि दो सेल्फी कॅमेऱ्यासोबत आहे. कंपनी या स्मार्टफोनला 9 मार्च रोजी लाँच करणार आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.