दारु जेवणाआधी प्यावी की नंतर? ड्रिंक करणाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करु नका

मद्यपान कऱणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही, याची कल्पना असतानाही अनेकजण करतात. पण काही गोष्टींचं पालन केलं तर तुमच्या शरिराला होणारं नुकसान कमी केलं जाऊ शकतं.  

Jul 19, 2023, 12:00 PM IST
1/10

मद्यपान कऱणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही, याची कल्पना असतानाही अनेकजण करतात. पण काही गोष्टींचं पालन केलं तर तुमच्या शरिराला होणारं नुकसान कमी केलं जाऊ शकतं.  

2/10

लग्न, पार्टी, डिनर, नाइट आऊट यावेळी अनेकजण मद्यपान करतात. अनेकांना जेवणाआधी तर काहींना जेवणानंतर मद्यपान करायला आवडतं.    

3/10

जेवणाआधी आणि जेवणानंतर मद्यपान केल्यास शरिरावर नेमका काय फरक पडतो हे समजून घ्या.   

4/10

जेव्हा आपण मद्याचा पहिला घोट घेतो तेव्हा ते प्रथम पोटात पोहोचते. जर आपण दारू पिण्याआधी काही खाल्ले असेल, तर पोट आधीच पचनक्रियेत व्यस्त असतं. त्यामुळे मद्य शरीरात लवकर शोषले जात नाही.  

5/10

पोट दारुला शोषतं, मात्र छोटी आतडी तुलनेत धीम्या गतीने काम करत असते. त्यामुळे जर आपण काही खाल्लं नसेल तर दारु पोटातून वेगाने छोट्या आतडीपर्यंत जाते आणि वेगाने रक्तात मिसळते.  

6/10

रक्तात मिसळल्यानंतर मद्य ह्रदय आणि मेंदूपर्यंत पोहोचतं, ज्यामुळे ती चढण्यास सुरुवात होते.   

7/10

जर तुम्ही रिकाम्या पोटी मद्यपान केलं तर मद्याला छोट्या आतड्यापर्यंत पोहोचण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे रिकाम्या पोटी दारु प्यायाल्याने लगेच तिचा परिणाम होतो. त्यामुळे जेवणानंतर मद्यपान केल्याने वेगळा फरक पडतो.   

8/10

अन्न हे दारुला अडवण्याचं काम करतं. सुरक्षा भिंतीप्रमाणे मधे उभं राहत अन्न मद्याचा छोट्या आतड्यातील शोषणाचा वेग कमी करतं. त्यामुळे जेवण केल्यानंतर मद्यपान केल्यास ती लगेच चढत नाही.   

9/10

पण मद्यपान आणि जेवण करताना दोन्ही गोष्टींमध्ये योग्य समतोल साधला जाईल याकडे लक्ष द्या. यामुळे तुम्ही योग्य प्रकारे मद्यपान करु शकाल.  

10/10

पण जर तुम्ही आरोग्यतज्ज्ञांचं मत जाणून घेतलंत तर, मद्यपान करण्याआधी कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनयुक्त जेवणं आणि मद्यपानासह हलके स्नॅक्स खा. यामुळे तुम्ही दुसऱ्या दिवशी होणाऱ्या हँगओव्हरपासून आपला बचाव कराल.