10 जणांना मिळूनही उचलता येणार नाही रेल्वेचं चाक! एका चाकाची किंमत EMI हूनही अधिक

Indian Railway Wheel Weight And Price: ट्रेनच्या एका चाकाचं वजन आणि किंमत दोन्ही गोष्ट पाहिल्या तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. ट्रेनच्या वेगवगेळ्या डब्यांच्या चाकांचं वजन वेगवेगळं असतं. तसेच ट्रेनच्या इंजिनची चाकं आणि डब्याच्या चाकांच्या वजनामध्ये फरक असतो. चला जाणून घेऊयात ही रंजक माहिती...

| Oct 23, 2023, 15:43 PM IST
1/13

weight of a single train wheel indian railway wheels price

रेल्वेच्या चाकांची किंमत किती आहे तुम्ही कधी विचार केला आहे का? किंवा या चाकांचं वजन एवढं असतं की 10 जण मिळूनही हे चाक उचलू शकत नाही. नेमकं वजन किती असतं आणि किंमत किती असते पाहूयात...

2/13

weight of a single train wheel indian railway wheels price

ट्रेनच्या चाकांचं वजन किती असेल असं तुम्हाला विचारलं तर याचं उत्तर तुम्हाला देता येणार नाही. याचसंदर्भात सविस्तरपणे जाणून घेऊयात आणि चाकाची किंमत किती आहे ते ही पाहूयात... 

3/13

weight of a single train wheel indian railway wheels price

भारतीय रेल्वेचा इतिहास आणि ट्रेनबद्दल अनेक रंजक किस्से आणि गोष्टी आहेत. यापैकी बऱ्याचश्या गोष्टी सर्वसामन्यांना ठाऊक नाहीत.

4/13

weight of a single train wheel indian railway wheels price

तुम्हाला हे जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल की ट्रेनच्या चाकांचं वजन एवढं असतं की 10 लोकांनी जोर लावला तरी हे एक चाक उचलता येणार नाही.

5/13

weight of a single train wheel indian railway wheels price

स्टील अथोरिटी ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार ट्रेनचं इंजिन आणि डब्यांच्या खालील चाकांचं वजन वेगवेगळं असतं.

6/13

weight of a single train wheel indian railway wheels price

सर्वाजिक वजनाची चाकं ही ईएमयू ट्रेनच्या डब्यांसाठी वापरली जातात. या चाकाचं वजन जवळपास 423 किलोग्रामपर्यंत असतं.

7/13

weight of a single train wheel indian railway wheels price

ट्रेनच्या सामान्य डब्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या चाकांच्या एका सेटचं वजन 384 ते 394 किलोग्राम इतकं असतं. तसेच लाल रंगाच्या एलबीएच डब्याचं वजन जवळपास 326 किलोग्रामपर्यंत असतं.

8/13

weight of a single train wheel indian railway wheels price

ट्रेनच्या इंजिनसाठी वापरल्या जाणाऱ्या चाकांचं वजन हे सामान्य डब्यांच्या चाकांच्या वजनापेक्षा अधिक असतं.

9/13

weight of a single train wheel indian railway wheels price

डिझेल इंजिनच्या चाकाच्या एका सेटचं वजन जवळपास 528 किलोग्राम इतकं असतं. तर इलेक्ट्रीक इंजिनच्या चाकाचं वजन 554 किलोग्राम असतं.

10/13

weight of a single train wheel indian railway wheels price

छोट्या मार्गिकांवर चालणाऱ्या म्हणजेच नॅरो गेज ट्रेन्सच्या इंजिनच्या चाकांचं वजन सर्वात कमी म्हणजे 144 किलोग्राम इतकं असतं.

11/13

weight of a single train wheel indian railway wheels price

आता ट्रेनच्या या चाकांच्या किंमतीबद्दल थोडं जाणून घेऊयात. तु्म्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण ट्रेनच्या एका चाकाची किंमत ही सर्वसाधारण बाईकच्या किंमतीपेक्षाही अधिक असते.

12/13

weight of a single train wheel indian railway wheels price

रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एचटीने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय रेल्वेकडून ट्रेनची चाकं आयात केली जातात. एका चाकाची किंमत 70 हजार रुपयांपर्यंत असते. 

13/13

weight of a single train wheel indian railway wheels price

एका डब्याला 8 चाकं असतात. एका ट्रेनच्या इंजिनमागे 24 डबे जोडले जातात. आता 70 हजारांच्या हिशेबाने आकडेमोड केली तर 8 गुणिले 24 गुणिले 70 हजार म्हणजेच 24 डब्यांच्या गाडीच्या चाकांचा खर्च 1 कोटी 34 लाख 40 हजार रुपये इतका येतो.