कधी साजरी होणार यंदाचा गुरु पौर्णिमा? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

गुरुपौर्णिमा ही खूप ठिकाणी आषाढपौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते. वेदांचे रचनाकार महर्षि द्वैपायन वेदव्यास यांचा या दिवशी जन्म झाला होता.

Jun 12, 2023, 22:30 PM IST

Guru Purnima 2023 : गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नम: ... गुरु पौर्णिमा ही गुरुला समर्पित असते. यादिवशी गुरुला अभिवादन केले जाते.  गुरुपौर्णिमा (Guru Purnima 2023)  ही आषाढ महिन्यातील (muhurat) पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. वेदांचे रचनाकार महर्षि द्वैपायन वेदव्यास (Maharshi Vyas) यांचा जन्म याच दिवशी झाला. यंदा गुरु पौर्णिमा 03 जुलै 2023 सोमवारी साजरा केली जाणार आहे. 

1/8

गुरु पौर्णिमा ही गुरुला समर्पित असते. या दुवशी गुरुचे पूजन केले जाते. अनेक जण साई बाबांचे देखील दर्शन घेतात. 

2/8

गुरु पौर्णिच्या दिवशी गुरु मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. 

3/8

धार्मिक मान्यतेनुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा फार फलदायी असते.

4/8

गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरुंचे पूजन करुन गुरुंचा आशिर्वाद घ्यावा. 

5/8

03 जुलै 2023 रोजी गुरुपूजन अर्थत गुरु पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जाणार आहे. 

6/8

पंचांगानुसार यंदा आषाढ महिन्याची पौर्णिमा 02 जुलै 2023 रोजी रात्री 08:21 पासून सुरू होऊन 03 जुलै 2023 पर्यंत संध्याकाळी 05:08 पर्यंत असणार आहे.   

7/8

 गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते.

8/8

गुरुपौर्णिमा हा पवित्र सण महर्षी वेदव्यास यांची जयंती म्हणून साजरा केला जातो.