शुभमन गिलसोबत नाव जोडण्यात आलेली 'ती' अभिनेत्री काय करते माहितीये?

'बहू हमारी रजनीकांत' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिद्धिमा पंडित ही सध्या चर्चेत आहे. तिचं चर्चेत असण्याचं कारण तिच्या आणि क्रिकेटपटू शुभमन गिलच्या लग्नाची बातमी. त्यावर रिद्धिमानं तिची प्रतिक्रिया दिली आहे. ही अफवाह असल्याचं तिनं सांगितलं असलं तरी देखील सगळे तिच्याविषयी ही चर्चा तर सुरुच आहे. 

| Jun 01, 2024, 16:37 PM IST
1/7

रिद्धिमा पंडित

रिद्धिमा पंडितचा जन्म हा 25 जून 1990 मध्ये मुंबईमध्ये झाला. तिची आई जयश्री ही गुजराती होती तर वडिल पंडित मराठी होती. 

2/7

बहीण

रिद्धिमा पंडितची एक बहीण आहे. जिचं नाव रीमा पंडित आहे आणि ती बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री रवीना टंडनची मॅनेजर आहे.   

3/7

पहिली मालिका

रिद्धिमा पंडितनं 2016 मध्ये 'बहू हमारी रजनीकांत' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्याच्या आधी तिनं अनेक ब्रॅन्ड्ससाठी मॉडेलिंग केली होती. तर या मालिकेसाठी तिला गोल्ड अवॉर्ड हा पुरस्कार मिळाला होता. 

4/7

रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक ते सुत्रसंचालन

 रिद्धिमा पंडितनं रिअॅलिटी शो देखील केले आहेत. 'खतरों के खिलाडी 9' या शोमध्ये ती दिसली होती आणि ती सेकेंड रनर-अप ठरली होती. त्याशिवाय 'बिग बॉस ओटीटी सीजन 1' मध्ये देखील ती दिसली. रिद्धिमा पंडितनं Dance Champions या शोचे सुत्रसंचालन केले आहे.   

5/7

हृतिक रोशनच्या भावाला डेट

रिपोर्ट्सनुसार, हृतिक रोशनचा भाऊ एहसान रोशनला डेट केल्याचे म्हटले जाते. मात्र, 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. त्याशिवाय तिचं नाव अभिनेता कुशाल टंडनशी जोडण्यात आलं होतं. पण कधी त्या दोघांनी त्याला अधिकृत केलं नाही. 

6/7

एग्स फ्रीज

रिद्धिमा पंडितनं ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की तिनं तिचे एग्स फ्रीज केले आहेत. हे तिनं गेल्या वर्षी म्हणजे सप्टेंबर 2023 मध्ये केलं. त्यानंतर तिनं सांगितलं की सध्या तिचा कोणी पार्टनर नाही. त्यामुळे तिला नंतर पश्चाताप करायचा नाही आणि बाळाला जन्म देण्यासाठी तिला लग्न करण्याचा दबाव जाणवणार नाही.   

7/7

एका एपिसोडचं मानधन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिद्धिमा पंडित एका एपिसोडच्या शूटसाठी 35 ते 40 हजार मानधन घेते. दरम्यान, याविषयी अधिकृत माहिती नाही.