इंडियन आयडलमध्ये रिजेक्ट झालेली 'मिर्झापूर' ची सलोनी भाभी आहे तरी कोण?

'मिर्झापूर 3' रिलीज होऊन काही दिवस झालेत. मात्र, सोशल मीडियावर या चित्रपटाने खळबळ उडवून दिलीय. मिर्झापूर 3 मधील सलोनी भाभी सध्या जास्त चर्चेत आलीय. कोण आहे सलोनी भाभी जाणून घ्या सविस्तर

Jul 10, 2024, 15:10 PM IST

Mirzapur 3: 'मिर्झापूर 3' रिलीज होऊन काही दिवस झालेत. मात्र, सोशल मीडियावर या चित्रपटाने खळबळ उडवून दिलीय. मिर्झापूर 3 मधील सलोनी भाभी सध्या जास्त चर्चेत आलीय. कोण आहे सलोनी भाभी जाणून घ्या सविस्तर

1/7

सुंदरता म्हणजे सलोनी भाभी:

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मिर्झापूर 3 अखेर रिलीज झाला असून त्याला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, यात सर्वात चर्चेत असणारी सलोनी त्यागीच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री नेहा सरगम सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. 

2/7

इंडियन आयडलमध्ये रिजेक्ट:

मिर्झापूर 3 मधील सलोनी भाभी म्हणजेच नेहा सरगम हिने इंडियन आयडॉलमध्ये भाग घेतला होता. मात्र, दुर्दैवाने स्पर्धेदरम्यान घशाच्या संसर्गामुळे तिला नाकारण्यात आले. 

3/7

भारताची नवीन क्रश नेहा सरगम:

अभिनयासोबतच सौंदर्य आणि रोमान्समुळे मिर्झापूर 3 मधील सलोनी भाभी खूपच चर्चेत आलीय. सलोनी भाभीचे सौंदर्य चाहत्यांना खूपच आकर्षित करत असून सध्या सोशल मीडियावर ती भारताची नवीन क्रश बनलीय.

4/7

मिनी ड्रेसमध्ये कातिलाना लूक

नेहा नेहमी चाहत्यांसाठी तिचे पारंपारिक आणि वेगवेगळ्या लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. कुरळे केस आणि लाल रंगाच्या प्रिंटेड मिनी ड्रेसमध्ये तिने चाहत्यांना सौंदर्याची जादू दाखवलीय. 

5/7

गाऊनमध्ये सलोनी भाभी:

सिल्व्हर गाऊनमध्ये नेहा खूपच सुंदर दिसतेय. नेहाच्या क्यूट स्माईल आणि अदांनी चाहत्यांना वेड लावलं आहे. सरळ केस आणि पांढऱ्या मोत्याच्या ड्रॉप इअररिंग तिने परिधान केल्या आहेत 

6/7

सीता आणि लक्ष्मी झाली

नेहाने 'रामायण जीवन का आधार'मध्ये सीतेची भूमिका साकारली होती. त्याच बरोबर तिने 'परमावतार श्री कृष्ण' मध्येही लक्ष्मीची भूमिका साकारली आहे.

7/7

मिर्झापूरची सलोनी आता काय करतेय?

​​2010 पासून नेहा सरगम टीव्ही जगतात खूप सक्रिय आहे. आजही ती या इंडस्ट्रीत कार्यरत आहे. 2022 मध्येच ती 'यशोमती मैया के नंदलाला'मध्ये आई 'यशोधा'ची भूमिका साकारताना दिसली होती.