आर्मी कॅन्टीनमध्ये मिळणारं सामान इतकं स्वस्त का असतं? खरं कारण माहितीये?
Army Canteen : गोष्टी स्वस्त मिळणं किंवा त्यांच्या विक्रीदरात तफावत असणं हे गणित इथं कसं बुवा जमतं? तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का?
Army Canteen : आर्मी कॅन्टीनमध्ये ना अमूक एक गोष्ट स्वस्त मिळते. तमुक गोष्टीची किंमत बरीच कमी असते असं कोणीतरी बोलताना तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.
1/9
Army Canteen
2/9
सवलती
विविध ब्रँडनी सुरु केलेल्या दुकानांमध्ये सातत्यानं काही सवलती सुरु असतात. ज्यामुळं ग्राहकांचं लक्ष वेधलं जातं. पण, या साऱ्या सवलतींच्या वरचढ ठरतात ती म्हणे आर्मी कॅन्टीन किंवा आर्मी स्टोअर. एखादं उपकरण असो किंवा मग गरम मसाल्याचे पदार्थ, बाहेरच्या दुकानांच्या तुलनेत इथं विक्रीसाठी असणाऱ्या उत्पादनांचे दर तुलनेनं बरेच कमी असतात. पण, हे नेमकं कसं शक्य होतं? इतके कमी दर परवडतात कसे? हा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का?
3/9
आर्मी कॅन्टीन
4/9
3700 आर्मी कॅन्टीन
CSD अर्थात कॅन्टीन स्टोर्स किंवा आर्मी स्टोअर्स डिपार्टमेंटची सुरुवात 1948 मध्ये झाली, जिथं लष्कर आणि संरक्षण दलाच्या सेवेत असणाऱ्यांसाठी दैनंदिन वापरातील गोष्टी उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये अन्नधान्यांपासून अगदी कपडे, बूट, उपकरणांचाही समावेश करण्यात आला. महत्त्वाचे लष्करी तळ असणाऱ्या ठिकाणांवर हे आर्मी कॅन्टीन/ स्टोअर असून, ते लष्करातील मंडळीच चालवतात. आजच्या घडीला भारतात साधारण 3700 आर्मी कॅन्टीन युनिट सक्रिय आहेत.
5/9
1 कोटी 30 लाखांहून अधिक कुटुंबांना फायदा
भारतीय लष्करातील जवानांसाठी सुरु करण्यात आलेल्या कॅन्टीन स्टोर्स डिपार्टमेंटमध्ये परवानगी असणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला म्हणजेच लष्कराच्या सेवेत असणाऱ्या आणि निवृत्त अधिकारी, जवानांसह विविध हुद्द्यांवरील अनेकांनाच बऱ्याच सवलती मिळतात. आज जवळपास 1 कोटी 30 लाखांहून अधिक जवान आणि त्यांच्या कुटुंबांना या सवलतीचा होतो.
6/9
स्मार्ट कार्ड
आर्मी कॅन्टीनच्या या सेवेसाठी लष्कराच्या जवानांसाठी स्मार्ट कार्ड जारी केलं जातं. या कार्डचा वापर करून इथं खरेदी करता येते. या कार्डमध्येही दोन प्रकार असतात, ज्यामध्ये एक असतं ग्रॉरी आणि दुसरं असतं लिकर कार्ड. ग्रॉसरी कार्डच्या माध्यमातून किराणा, विद्युत उपकरणं अशा वस्तूंची खरेदी करता येते. तर, लिकर कार्डवर मद्याची खरेदी करता येते.
7/9
सामान्य नागरिकांना खरेदी करता येते का?
8/9
जीएसटीमध्ये सूट
9/9